मुंबई : माझ्या वजनावरुन मुख्यमंत्री यांनी काल माझ्यावर टीका केली पण लक्षात ठेवा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मैद्याचं पोतं म्हणायचे. आज त्याच मैद्याच्या पोत्यासमोर नाक घासून तुम्ही मुख्यमंत्री झालात, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला विरोधी पक्षनेते यांनी प्रत्युत्तर दिलं. मुंबईतील गोरेगावच्या नेस्को मैदानावर हिंदी भाषिक उत्तर भारतीय संमेलनाच्या मंचावरुन देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ललकारलं. मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक टीकेला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. आज फडणवीस वेगळ्याच आवेषात होते. त्यांनी भाषणाच्या पहिल्या मिनिटांपासून भाषण संपेपर्यंत फक्त उद्धव ठाकरे आणि शिवसेनेलाच लक्ष्य केलं. बाबरीपासून हिंदुत्वापर्यंत, हनुमान चालिसेपासून औरंगजेबापर्यंत, कोरोना भ्रष्टाचार, साधूंची हत्या, मनसुख हिरेन ते अनिल देशमुखांची जेल, अशा सगळ्या मुद्द्यांवरुन फडणवीसांनी ठाकरेंना 'ठोक के' प्रत्युत्तर दिलं. त्याच मैद्याच्या पोत्यासमोर नाक घासून तुम्ही मुख्यमंत्री झालात! बाबरी पाडायला गेलो होतो म्हणणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र पडणवीस यांची काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खिल्ली उडवली. 'देवेंद्र फडणवीस यांनी बाबरीवर पाय जरी ठेवला असता तरी बाबरी खाली कोसळली असती', असा टोमणा मुख्यमंत्र्यांनी फडणवीस यांना मारला. त्यांच्या याच टोमण्याला फडणवीसांनीही त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलंय. "काल उद्धव ठाकरे म्हणाले, मी बाबरीवर पाय ठेवला असता तर बाबरी पडली असती. मला त्यांना सांगायचंय, आज माझं वजन १०२ किलो आहे, बाबरी पाडायला गेलो होतो त्यावेळी माझं वजन १२८ किलो होतं, लाजायचं काय त्यात? पण लक्षात घ्या, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मैद्याचं पोतं म्हणायचे. आज त्याच मैद्याच्या पोत्यासमोर नाक घासून तुम्ही मुख्यमंत्री झालात. त्यामुळे वजनदार माणसापासून सावध राहा, अशा इशारा फडणवीसांनी ठाकरेंना दिला. मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण सोनिया गांधींना खूश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची कालची सभा ही सोनिया गांधींना खूश करण्यासाठी होती. त्यांना सोनिया गांधींना दाखवायचं होतं ती बघा मी हिंदुत्वावर बोलतो आणि आरएसएसवर टीका करतो. त्यांना त्यांचं काम केलंय. पण मी पुन्हा एकदा सांगतो, ते म्हणजे हिंदुत्व नाही, ते म्हणजे मुंबई नाही, ते म्हणजे मराठी नाही, असा पुनरुच्चार फडणवीस यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सभेची सांगता 'हिंदू जागो तो' या गीताने केली. 'जागो तो एकबार हिंदू जागो तो, जागे थे वीर शिवाजी, भागे सारे दुष्मन पाजी, मचा दिया संग्राम जागो, जागो तो, या गीताने सभेचा शेवट झाला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3Cyk5Bb
No comments:
Post a Comment