Breaking

Sunday, May 15, 2022

राजस्थानच्या लखनौवरील विजयानंतर प्ले ऑफच्या समीकरणात मोठा बदल, गुणतालिकेतील चुरस टिपेला https://ift.tt/Rd5v9SM

मुंबई : राजस्थानच्या संघाने लखनौवर दमदार विजय साकारला खरा, पण त्यामुळे प्ले ऑफच्या समीकरणामध्ये मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळाले. कारण लखनौने जर हा सामना जिंकला असता तर त्यांना थेट प्ले ऑफचे तिकीट मिळाले असते. पण आजच्या सामन्यात त्यांचा पराभव झाला आणि ते १६ गुणांवरच कायम राहिले आहेत. दुसरीकडे राजस्थानच्या संघाने या विजयासह राजस्थानचेही १६ गुण झाले आहेत. पण लखनौच्या संघाने यावेळी २४ धावांनी विजय साकारत लखनौच्या संघाला गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर ढकलले असून त्यांनी आता दुसरे स्थान पटकावले आहे. लखनौच्या पराभवामुळे आता बाकीच्या सहा संघांना दिलासा मिळला असून त्यांची प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता वाढली आहे. राजस्थानने लखनौपुढे १७९ धावांचे दमदार आव्हान ठेवले होते. पण लखनौच्या संघाला यावेळी चांगली सुरुवात करता आली नाही. कारण ट्रेंट बोल्टने तिसऱ्याच षटकात लखनौच्या संघाला दुहेरी धक्के दिले. तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ट्रेंल बोल्टने क्विंटन डीकॉकला बाद केले आणि लखनौला पहिला धक्का दिला. दुसऱ्या चेंडूवर बोल्टने यावेळी सलग दुसरी विकेट घेतली. बोल्टने आयुष बदोनीला पहिल्याच चेंडूवर पायचीत पकडले. यानंतर सर्वांच्या नजरा या कर्णधार लोकेश राहुलवर होत्या. पण राहुलही यावेळी १० धावांवर असताना बाद झाला आणि लखनौच्या संघाला मोठा धक्का बसला. राहुल बाद झाल्यावर दीपक हुडा आणि कृणाल पंड्या यांनी काही काळ फलंदाजी करत धावा जमवल्या. पण कृणाल यावेळी २५ धावांवर असताना बाद झाला आणि लखनौच्या संघाला चौथा धक्का बसला. दीपक हुडाने यावेळी अर्धशतक झळकावत लखनौला विजयाच्या आशा दाखवल्या होत्या. पण तो ५९ धावांवर बाद झाला आणि लखनौच्या विजयाच्या आशा मावळल्या. राजस्थानच्या संघाने नाणेफेक जिंकत सर्वांनाच धक्का दिला. कारण टॉस जिंकल्यावर प्रत्येक संघ गोलंदाजी स्विकारतो, पण राजस्थानने यावेळी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनचा हा निर्णय योग्य असल्याचे त्यांच्या फलंदाजांनी दाखवून दिले. राजस्थानच्या एकाही फलंदाजाला अर्धशतक साजरे करता आले नाही. पण त्यांच्या फलंदाजांनी उपयुक्त फलंदाजी केली आणि सातत्याने त्यांनी संघाचा धावफलक हलता ठेवला. त्यामुळेच राजस्थानला जोस बटलरच्या रुपात पहिला धक्का लवकर बसल्यावरही मोठी धावसंख्या उभारता आली. बटलर हा यावेळी फक्त दोन धावा करू शकला. पण त्यानंतर कर्णधार सॅमसन आणि यशस्वी जैस्वाल यांनी लखनौच्या गोलंदाजीवर कडक प्रहार केला आणि दुसऱ्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी रचली. सॅमसनने सर्वांची मनं जिंकली खरी, पण त्याला मोठी खेळी मात्र साकारता आली नाही. संजूने यावेळी सहा चौकारांच्या जोरावर ३२ धावा केल्या. त्यानंतर यशस्वी जैस्वालही ४१ धावांवर बाद झाला आणि राजस्थानला एकामागून एक मोठे धक्के बसले. पण या धक्क्यातून राजस्थानचा संघ सारवला तो मधल्या फळीतील फलंदजांमुळे. देवदत्त पडीक्कलने यावेळी १८ चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ३९ धावांची वादळी खेळी साकारली आणि राजस्थानची धावगती चांगलीच वाढली. त्यामुळेच राजस्थानच्या संघाला लखनौपुढे १७९ धावांचे आव्हान देता आले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/6Lf2qWv

No comments:

Post a Comment