Breaking

Monday, May 30, 2022

केंद्रीय मंत्र्याचं तिकीट कापलं, महाराष्ट्राच्या सुपुत्राला उमेदवारी, नितीशकुमारांचा मास्टरस्ट्रोक https://ift.tt/ElmC4HD

नवी दिल्ली : राज्यसभेच्या () ५७ जागांसाठी द्वीवार्षिक निवडणूक जाहीर झालीय. महाराष्ट्रातील ६ जागांवर निवडणूक होणार आहे. भाजपनं ३, शिवसेनेनं २ आणि काँग्रेसनं १ आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं १ उमदेवार दिलाय. महाराष्ट्रातील ६ जागांसाठी ७ उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानं निवडणुकीतील रंगत वाढलीय. दुसरीकडे बिहारचे मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्राच्या सुपुत्राला उमेदवारी जाहीर केलीय. हे करत असताना नितीशकुमार ( ) यांनी धक्कातंत्र वापरत केंद्रीय मंत्री यांचं तिकीट कापलं आहे. आता आरसीपी सिंग यांना आगामी काळात राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्र्याचं तिकीट कापलं, महाराष्ट्रीयन आणि झारखंडच्या व्यक्तीला उमदेवारी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गेल्या काही वर्षांपासून जदयूवर एकहाती वर्चस्व ठेवलंय. जदयूतील अनेक नेत्यांचं महत्त्व त्यांनी कमी केलंय. नितीशकुमार यांनी आज देखील एक धक्कादायक निर्णय घेतला. राज्यसभेच्या दोन जागांसाठी नितीशकुमार यांनी आणि खीरु महतो यांना उमेदवारी दिली. केंद्रीय मंत्री आरसीपी सिंग यांना उमेदवारी न देता जॉर्ज फर्नांडिस यांचे निकटवर्तीय अशी ओळख असलेल्या आणि जदयूच्या दिल्लीतील कार्यालयात वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्राच्या अनिल हेगडे यांना त्यांनी उमेदवारी जाहीर केली. तर, दुसरी उमेदवारी झारखंडमधील जेडीयू नेते खीरु महतो यांनी दिली आहे. आरसीपी सिंग हे आयएस होते. नितीशकुमार यांनी त्यांना दोन वेळा राज्यसभेवर संधी दिली होती. आरसीपी सिंग यांना तिसरी टर्म न देता नितीशकुमार यांनी मोठी खेळी केली आहे. जदयूतर्फे अनिल हेगडे आणि खीरु महतो यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळं आरसीपीसिंग यांच्यापुढं भाजपच्या मदतीचा पर्याय शिल्लक राहतो. भाजपनं मदत केल्यास आरसीपी सिंग यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो. बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांनी आरसीपी सिंग यांच्यावर जबाबदारी सोपवली होती. तिकीट वाटपाचे अधिकार देखील त्यांना दिले होते. मात्र, जेडीयूला या निवडणुकीत धक्का बसला होता. जेडीयूची गेल्या २० वर्षातील सर्वात खराब कामगिरी २०१९ मध्ये झाली. ११५ जागा लढवलेल्या जदयूला केवळ ४३ जागांवर विजय मिळवता आला होता. २०२१ च्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात जदयूला दोन मंत्रिपदं हवी होती. भाजपसोबत चर्चेची जबाबदारी आरसीपी सिंग यांच्यावर देण्यात आली होती. मात्र, जदयूला केवळ एक मंत्रिपद मिळालं आणि ते देखील आरसीपी सिंग यांनाच त्यामुळं पक्षात नाराजी निर्माण झाली होती. आता नितीशकुमार यांनी आरसीपी सिंग यांची उमेदवारी कापलीय.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/SJmEtWN

No comments:

Post a Comment