मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री () यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचं म्हटलं आहे. अध्यक्ष () यांनी औरंगाबादमध्ये घेतलेल्या सभेसंदर्भात विचारलं असता अजित पवार यांनी आजचा चागंला दिवस आहे. या तीन तासात काय घडलं हे माहिती नसल्याचं म्हटलं आहे. अजित पवार यांनी महाराष्ट्र हे देशातील प्रगत राज्य असल्याचं म्हणत राज्यातील जनतेला कायदा सुव्यवस्था राखण्याचं आवाहन केलं आहे. अजित पवार काय म्हणाले?आजचा चांगला दिवस आहे. मला या तीन तासात काय झालं हे माहिती नाही. महाराष्ट्राच्या जनतेला एकचं आवाहन करेन की शेवटी आपलं महाराष्ट्र आहे. संपूर्ण देशात आपल्या राज्याकडे प्रगत राज्य म्हणून पाहिलं जातं. सर्वांनी एकोपा ठेवला पाहिजे, जातीय एकोपा ठेवला पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. कुठल्याही परिस्थिती कुठल्याही स्थितीत कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही ही दक्षता घेणं सर्वांची जबाबदारी आहे, ती सर्वांनी पार पाडलीच, त्यामध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील राज ठाकरे यांच्या सभेवरुन टीका केली आहे. भाजपकडून केंद्राचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी राज ठाकरेंचा वापर केला जात असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला आहे. तर, दुसरीकडे आरपीआय खरात गटाचे सचिन खरात यांनी राज ठाकरे जर जात पात मानत नसतील तर त्यांनी मनूस्मृती दहन करावं, असं आव्हान केलं आहे. शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी देखील राज ठाकरे यांच्या सभेवर भाष्य करण्याचं टाळलं. आम्ही १४ मेच्या सभेत उत्तर देऊ, असं म्हटलं आहे. राज ठाकरेंचा ४ मे चा अल्टिमेटम राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत बोलताना ४ मे पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवले नाहीत तर हनुमान चालिसा दुप्पट आवाजात लावण्याचं आवाहन केलं आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला कायदा व सुव्यवस्था राखण्याचं आवाहन केलं आहे. महाराष्ट्र हे देशातील प्रगत राज्य असल्याचा दाखला देखील अजित पवार यांनी दिला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/RSiFs7z
No comments:
Post a Comment