नवी दिल्ली : नोएडामध्ये अज्ञात व्यक्तींनी सहा वर्षीय या मुलीच्या डोक्यात गोळी मारली. यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. रोली ब्रेनडेड झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं. नवी दिल्लीच्या एम्सनं तिच्या आई वडिलांशी अवयवदानासंदर्भात चर्चा केली. रोली प्रजापतीचे आई वडीलांनी अवयवदानाला संमती दर्शवली. यानंतर रोली हिचं करण्यात आल्यानं पाच जणांचा जीव वाचला. रोली प्रजापती एम्सच्या इतिहासातील सर्वात कमी वयाची अवयवदाता ठरली आहे. रोलीच्या डोक्यात अज्ञात व्यक्तीनं नोएडामध्ये गोळी झाडली होती. यानंतर तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, तिची स्थिती नाजूक झाली होती आणि कोमामध्ये गेली होती. तिला एम्समध्ये दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. यांनतर तिला नवी दिल्ली येथील एम्समध्ये दाखल करण्यात आलं.डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आलं नाही. अखेर तिला ब्रेनडेड घोषित करण्यात आलं. ए्म्सचे न्यूरोसर्जन डॉ. दीपक गुप्ता यांनी यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे. रोली या सहा वर्षांच्या मुलीला डोक्यात गोळीबार झाल्यानं २७ एप्रिलला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिच्या मेंदूत गोळी अडकली होती. तिचा मेंदू पूर्णपणे निकामी झाला होता. रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा ती ब्रेनडेड होती. त्यानंतर आम्ही तिच्या कुटुंबीयांशी चर्चा केली, असं गुप्ता म्हणाले. रोली ब्रेनडेड झाल्याचं निदान झालं होतं आमच्या डॉक्टरांच्या टीमनं तिच्या आई वडिलांशी चर्चा केली. आम्ही त्यांना अवयवदानासंदर्भात माहिती दिली. त्यांचं समुपदेशन केलं. तुमची परवानगी असल्यास रोलीचं अवयवदान केल्यास इतरांचे प्राण वाचतील असं सांगितलं. यानंतर ते अवयवदानाला तयार झाले, असं गुप्ता म्हणाले. एम्स रुग्णालयातील डॉक्टरांनी रोली प्रजापती हिच्या आई आणि वडिलांबद्दल आदर व्यक्त केला आहे. त्यांनी मुलीचं अवयवदान करण्याचा निर्णय घेतल्यानं ५ जणांचा जीव वाचला आहे. रोलीचं यकृत, किडनी, ह्रदयाचा वापर करण्यात आला, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. १९९४ मध्ये आम्ही अवयवदान सुविधा सुरु केली. तेव्हापासून आतापर्यंत दिल्ली आणि एनसीआरमधील रोली ही सर्वात कमी वयाची अवयवदाता ठरल्याचं डॉ.गुप्ता यांनी सांगितलं. रोलीचे वडील हरनारायण प्रजापती यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलतना डॉ. गुप्ता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अवयवदानाद्वारे आमची मुलगी इतरांचे प्राण वाचवू शकते, असं सांगतिलं.त्यामुळं आम्ही हा निर्णय घेतला. आमची मुलगी यानिमित्तानं जिवंत राहिल असं वाटलं. इतरांच्या आयुष्यात त्यामुलं आनंद निर्माण होईल, असं प्रजापती म्हणाले. पूनम देवी यांनी भावूक होत आमची मुलगी आमच्यात नसली तरी तिचं अवयवदान केल्यानं इतरांचे प्राण वाचू शकले, असं म्हटलं.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/aes7Jbr
No comments:
Post a Comment