Breaking

Sunday, May 1, 2022

रमजान ईद आता मंगळवारी होणार साजरी, शेवटचा उपवास सोमवारी https://ift.tt/op1YdiK

म. टा. प्रतिनिधी, पुणे मुस्लिम बांधवांच्या रमजान महिन्याचा चंद्र रविवारी दिसला नसल्याने आता (Ramadan Eid) मंगळवारी (३ मे) साजरी होणार आहे. हिलाल सिरत कमिटीच्या झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे सोमवारी महिन्याचा शेवटचा तिसावा (रोजा) करण्यात येणार आहे. () क्लिक करा आणि वाचा- गेली महिनाभर मुस्लिम बांधव रमजान महिन्याचे कडक उपवास करीत होते. पहाटे सहेरी करून सूर्यास्तानंतर इफ्तारी करून दिवसभराच्या निर्जल उपवास सोडला जात होता. त्याशिवाय विशेष नमाज पठण केली जात होता. कुराणाचे देखील पठण करीत अल्लाहचे नामसमरण करून सुख, शांती बरोबर आयुष्यात येणारी संकटे दूर करण्याची दुआ मागण्यात आली. रविवारी चंद्रदर्शन होईल अशी मुस्लिम बांधवांना अपेक्षा होती मात्र पुण्यासह देशात कोठेही चंद्र दर्शन झाले नाही. क्लिक करा आणि वाचा- याबाबत हिलाल सिरत कमिटीचे सरचिटणीस रफिउद्दीन शेख म्हणाले, 'पुण्यात रविवारी चंद्रदर्शन कोठेही झाले नाही. त्यामुळे सोमवारी दोन मे रोजी शेवटचा तिसावा उपवास होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी, तीन मे रोजी रमजान ईद साजरी होईल.' क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/jiaWIlD

No comments:

Post a Comment