अहमदनगर: गावातील तंटे गावातच मिटविण्यासाठी राज्य सरकारने तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली आहे. मात्र, अलीकडे ही मोहीम केवळ कागदावरच उरली आहे. गावातील राजकारणामुळे या योजनेला बहुतांश ठिकाणी अपयश येत असल्याचे आढळून येते. सारख्या काही मोजक्या गावात ही योजना सुरू होती. मात्र, आता तेथेही निवडणुकीचे राजकारण आडवे आले आहे. त्यामुळे गावाला निर्णय बदलावा लागला आहे. (the gram panchayat has decided to go to the police station to resolve any further disputes in village) गेल्या ३० वर्षांपासून आदर्शगाव हिवरे बाजारमध्ये शेती आणि शिवारासंबंधीचे वाद आणि त्यावरून निर्माण होणारे तंटे गावातच मिटविण्यात येत होते. मात्र, यावेळी ग्रामपंचायतीची निवडणूक झाल्याने अन्य गावांप्रमाणेच तेथील वातावरण बदलले आहे. त्यामुळे यापुढे कोणतेही तंटे समितीसमोर थेट न आणता आधी पोलिस ठाण्यात नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता सुमारे तीस वर्षांनंतर गावकऱ्यांना अशा तंट्यांसाठी पोलिस ठाण्याची पायरी चढावी लागणार आहे. क्लिक करा आणि वाचा- महाराष्ट्र दिनी झालेल्या विशेष ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती राज्याच्या आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांनी दिली आहे. या गावात शिवार वाहतुकीचे रस्ते, बांध व जमिनीचे पोटहिस्से यावरून निर्माण होणारे तंटे गेली ३० वर्षापासून गावपातळीवर मिटवले जात होते. परंतु गेल्या वर्षी प्रथमत ३५ वर्षांनंतर हिवरे बाजार ग्रामपंचायतीची निवडणूक झाली आहे. त्यामुळे तंट्यांना राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे. म्हणून यासंबंधी आधी पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी. नंतर दोन्ही पक्षांना वाटले तर ते पुन्हा गावातील तंटामुक्ती समितीकडे येऊन आपसांत तडजोड करू शकतात, असे ठरविण्यात आले आहे. क्लिक करा आणि वाचा- ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या राजकारणामुळे गावाच्या विकासावर होणारे परिमाण आता हिवरे बाजारमध्येही दिसू लागले आहेत, असे यावरून दिसून येते. या गावाने एकजुटीने विकास कामे केल्याने गाव आदर्श झाले होते. गावात राजकारण येणार नाही, याचा कटाक्षकाने प्रयत्न केला गेला. निवडणुका बिनविरोध करण्यावर त्यासाठी भर देण्यात येत होता. मात्र, यावेळी झालेल्या निवडणुकीत काही कार्यकर्त्यांनी ही एक प्रकारे दडपशाही असल्याचा आरोप करून निवडणूक लढविली. अर्थात त्यांचा पराभव झाला. मात्र, त्यामुळे गावातील एकजुटीला तडा गेल्याचे दिसून येत आहे. धारदार हत्याराने डिक्की फोडून, बॅगा फाडून करत होते चोऱ्या, पोलिसांनी 'अशी' पकडली टोळी क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/JArNfly
No comments:
Post a Comment