Breaking

Friday, May 27, 2022

जोस बटलर आता फायनलमध्ये मोडू शकतो हे मोठे विक्रम आणि ठरू शकतो मिस्टर आयपीएल... https://ift.tt/pFqrIlH

अहमदाबाद : जोस बटलरच्या शतकी खेळीने सर्वांचे डोळे दिपले. आपल्या नेत्रदीपक फटकेबाजीच्या जोरावर बटलरने काही विक्रम आरसीबीविरुद्धच्या क्वालिफायर-२ या सामन्यात रचले आहेत. पण आता फायनलमध्ये बटलर हा अजून नवे विक्रम रचू शकतो. फायनलमध्ये जोस बटलर कोणते नवीन विक्रम रचू शकतो, जाणून घ्या...आरसीबीविरुद्ध खेळत असताना बटलरने ६० चेंडूंत १० चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर नाबाद १०६ धावांची खेळी साकारली. हे बटलरचे या आयपीएलमधले चौथे शतक ठरले. त्याचबरोबर या हंगामातील सर्वाधिक धावाही आता बटलरच्या नावावर आहेत. त्यामुळे ऑरेंज कॅपचा मानकरी तोच ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पण बटलर आता फायनलमध्ये काही मोठे विक्रम आपल्या नावावर नक्कीच करू शकतो. या आयपीएलध्ये त्याने चार शतकं झळकावली आहेत. आतापर्यंत एकाही परदेशी खेळाडूला आयपीएलच्या एका हंगामात एवढी शतकं झळकावता आलेली नाही. पण २०१६ साली आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली हा भन्नाट फॉर्मात होता आणि त्याने चार शतकं झळकावली होती. या विक्रमाशी आता बटलरने बरोबरी केली आहे. पण आता फायनलमध्ये जर बटलरने शतक झळकावले तर तो कोहलीचा २०१६ साली झालेला विक्रम मोडीत काढू शकतो आणि एका आयपीएलच्या हंगामात सर्वाधिक शतकं झळकावणारा खेळाडू ठरू शकतो. त्यामुळे आता फायनलमध्ये बटलर शतक झळकावतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. बटलरची बॅट जर अशीच तळपत राहीली तर कदाचित अजून काही विक्रम तो फायनलमध्ये रचण्याची शक्यता आहे. आतापर्यंतच्या या आयपीएलमधील १६ सामन्यांमध्ये बटलरच्या नावावर ८२४ धावा जमा झाल्या आहेत. आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा रचणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर आहे. कारण डेव्हिड वॉर्नरच्या नावावर ८४८ धावा आहेत. त्यामुळे बटलरने या सामन्यात जर २५ धावा केल्या तर त्याला वॉर्नरचा विक्रम मोडीत काढता येऊ शकतो. या यादीमध्ये अव्वल स्थानावर आहे तो विराट कोहली. कोहलीने २०१६ साली चार शतकांसह ९७३ धावा केल्या होत्या. हा विक्रम जर बटलरला मोडायचा असेल तर त्याला अंतिम फेरीत १५० धावा कराव्या लागतील. आयपीएलच्या फायनलमध्ये हे शक्य होईल का, असा प्रश्न आता चाहत्यांना पडलेला आहे. पण क्रिकेटमध्ये अशक्य अशी कोणतीच गोष्ट नसते. त्यामुळे आता आयपीएलच्या अंतिम फेरीत बटलर नेमके कोणते नवीन विक्रम रचतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/xkQvTln

No comments:

Post a Comment