परभणी: या शेतातून तुम्ही निघून जा, हे शेत आमचे आहे, इथून निघुन गेला नाहीत तर आम्ही तुम्हाला याच शेतामध्ये जेसीबीने खड्डा करुन पुरुन टाकू अशी धमकी देऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने आमदार डॉ. () यांच्यासह तिघांवर गंगाखेड पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना गंगाखेड तालुक्यातील बनपिंपळा शिवारात २० मे रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्यासह साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परभणी पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे. गेल्या १० वर्षांपासून वाद तारामती शेषेराव कोरके यांचे बनपिंपळा शिवारात सर्वे ६/३ मध्ये साडे तीन एकर शेत आहे. या जमीनीबाबत आ. डॉ. रत्नाकर गुट्टे, बाबा पोले, हनुमान लटपटे या तिघांसोबत मागील दहा वर्षापासून वाद सुरु आहे. या बाबत न्यायालयात देखील दावा झाला आहे. शुक्रवार २० मे रोजी तारामती कोरके व त्यांचे पती शेतामध्ये काम करत असताना गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे, बाबा पोले,हनुमान लटपटे हे तिघेजण तीस ते पसतीस जणांना सोबत घेऊन आले. त्यांनी तारामती कोरके यांना शेतातून बाहेरपडा नाहीतर इथेच खड्डा करुन पुरुन टाकू अशी धमकी दिली. शिवीगाळ करत मारहाण केल्याची तक्रार देण्यात आली आहे. या प्रकरणी गंगाखेड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास करत आहेत. गुन्हा दाखल करण्याची धमकी? तुम्ही हे शेत सोडा नाही तर तुमच्यावर ॲट्रॉसिटी सारखे खोटे गुन्हे दाखल करू आणि तुमच्या कुटुंबातील सर्वांना जीवे मारून टाकू असे म्हणत तारामती कोरके व त्यांच्या कुटुंबायांना धमकी दिली असल्याचे ठाणे मध्ये देण्यात आलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणामुळे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. दरम्यान, या प्रकरणी आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांची बाजू समजू शकलेली नाही.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/7tFsxJS
No comments:
Post a Comment