नवी दिल्ली : केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय अबकारी कर कमी केल्यानंतर पंतप्रधान ( ) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आमच्यासाठी लोक पहिलं प्राधान्य आहेत, असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. दुसरीकडे हा निर्णय जाहीर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितातरमण यांनी यापूर्वी करकपात न केलेल्या राज्यांना विशेष आवाहन केलं होतं. अर्थमंत्र्यांच्या आवाहनानंतर बिगरभाजपशासीत राज्यांवरील दबाव वाढला आहे. केरळनं देखील तातडीनं कर कपात जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले? आम्ही नेहमी लोकांचा पहिल्यांदा विचार केला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. आजच्या निर्णयामुळं पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये कपात होईल. या निर्णयामुळं विविध क्षेत्रांना दिलासा मिळेल, असं मोदी म्हणाले. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेद्वारे १२ गॅस सिलिंडरवर २०० रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. यामुळं जवळपास या योजनेच्या ९ कोटी लाभार्थ्यांना फायदा होणार आहे. यामुळं केंद्र सरकारच्या तिजोरीवर ६ हजार कोटींचा भार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात बोलताना उज्ज्वला योजनेचा कोट्यवधी भारतीयांना फायदा झाला आहे. विशेषत: महिलांना आजच्या निर्णयाचा फायदा होईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. केरळकडून कर कपात जाहीर केरळचे वित्तमंत्री के.एन. बालागोपाल यांनी करकपात जाहीर केली आहे. केंद्र सरकारच्या पाठोपाठ केरळमध्येही पेट्रोल आणि डिझेलवरील कर कपात जाहीर करण्यात आली आहे. पेट्रोलवरील कर २.४१ रुपये तर डिझेलवरील कर १.३६ रुपयांनी कमी करण्यात आला आहे. केरळच्या अर्थमत्र्यांनी कर कपातीची घोषणा करताना केंद्राच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. बालागोपाल यांनी फेसबुक पोस्ट करुन हा निर्णय जाहीर केला केला आहे. केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील कर कपात केल्यानंतर आता महाराष्ट्रासह बिगर भाजपशासीत राज्यांवरील दबाव वाढला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, अमरावतीच्या खासदार नवनती राणा यांनी महाराष्ट्र सरकारनं कर कपात जाहीर करावी, अशी मागणी केली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/zLGdnJs
No comments:
Post a Comment