Breaking

Wednesday, May 11, 2022

हेरवाडनंतर आता 'माणगाव' ग्रामपंचायतीचे मोठे पाऊल; विधवा प्रथेबाबत घेतला महत्वाचा निर्णय https://ift.tt/RYEoJX9

कोल्हापूर: हेरवाड पाठोपाठ आता कोल्हापुरातील माणगाव( ता. हातकणंगले) या गावाने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. आज ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंदीचा ठराव मंजूर केला. याबरोबरच गावातील प्रत्येक मुलीच्या लग्नात तिला सासरी जाताना भेट म्हणून पैठणी साडी देण्याचा सुद्धा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सध्या परिसरात या गावाचे कौतुक केल जात आहे. (Mangaon Gram Panchayat decided to ban the ) हे असं ठिकाण आहे जिथे सुमारे १०० वर्षांपूर्वी १९२० साली राजर्षी शाहू महाराजांनी शोषित लोकांची अस्पृश्यता परिषद आयोजित केली होती. ज्यामध्ये त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना भावी नेते म्हणून घोषित केले होते. माणगाव परिषद म्हणून त्या परिषदेला आजही ओळखले जाते. खऱ्या अर्थाने याच गावातून समतेचा संदेश सर्वत्र गेला आणि त्याची सुरुवात झाली. या गावात नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. ग्रामपंचायत सरपंच राजू मगदूम, उपसरपंच तसेच इतर सदस्य नेहमीच निर्णयांना पाठिंबा देताना पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे या गावाने जिल्ह्यात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. या कारणामुळे जिल्ह्यातल्या आदर्श ग्रामपंचायतींमध्ये माणगाव नेहमीच आघाडीवर राहिले आहे. क्लिक करा आणि वाचा- हेरवाड गावाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करत माणगाव ग्रामपंचायतीने आपल्या गावातही विधवा प्रथा बंदीचा निर्णय घेतला. तसेच गावातील प्रत्येक मुलीच्या लग्नात तिला गावाकडून माहेरची साडी म्हणून पैठणी भेट देण्याची एक चांगली प्रथा सुरु केली. खऱ्या अर्थाने राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी कोल्हापुरातून पुन्हा एका परिवर्तनाला सुरुवात झाली आहे. क्लिक करा आणि वाचा- कोल्हापूरमधील हेरवाड गावाने राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त ऐतिहासिक निर्णय घेत विधवा प्रथा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.. ग्रामपंचायतीने एका ठरावाद्वारे हा निर्णय घेतला. हेरवाड ग्रामपंचायतीने घेतलेल्या या निर्णयानंतर आता माणगाव ग्रामपंचायतीने पाऊल उचलत ही प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/o9D42AU

No comments:

Post a Comment