Breaking

Wednesday, May 18, 2022

जयप्रभा स्टुडिओसंदर्भातील मागणीसाठी रंगकर्मींचा सामुदायिक आत्मदहनाचा इशारा https://ift.tt/U7n4GJZ

म टा प्रतिनिधी, जयप्रभा स्टुडिओबाबत () सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा कोल्हापुरातील रंगकर्मींनी दिला आहे. ९५ दिवस आंदोलन सुरू असूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने आता सिनेसृष्टीतील कलावंत आक्रमक झाले आहेत. कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओची जागा सरकारने ताब्यात घेऊन ती महापालिकेला द्यावी आणि चित्रीकरणाला ती खुली करावी यासाठी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या वतीने गेले ९५ दिवस धरणे आंदोलन सुरू आहे. त्याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने आज शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. क्लिक करा आणि वाचा- येत्या काही दिवसात मागणीबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा आज देण्यात आला. गुरुवारी ताराराणी चौकात ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमगर, इम्तियाज बारगीर, रणजित जाधव, अवधूत जोशी, सतीश बिडकर, मिलिंद अष्टेकर यांच्यासह अनेक कलावंत व तंत्रज्ञ सहभागी झाले होते. क्लिक करा आणि वाचा- हा गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या मालकीचा आहे. दोन वर्षापूर्वी कोल्हापुरातील काही बांधकाम व्यावसायिकांनी या स्टुडिओची जागा खरेदी केली. दोन वर्षानंतर हा व्यवहार उघडकीस आला. यामुळे ती जागा सरकारने ताब्यात घ्यावी आणि तेथे चित्रीकरण करण्यास परवानगी द्यावी अशी रंगकर्मींची मागणी आहे. या मागणीसाठी ते स्टुडिओच्या दारात आंदोलन करत आहेत. तीन महिने उलटले तरी या आंदोलनाची दखल कुणीच घेतली नाही. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या पुढाकाराने हे आंदोलन सुरू आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/MRlYCgH

No comments:

Post a Comment