रत्नागिरी : कोकणात दरवर्षी पडणारा पाऊस डोळ्यात पाणी आणत असला तरी उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाईची झळ मात्र रत्नागिरी जिल्हयात अनेक ठिकाणी जाणवायला लागली आहे. याचा फटका आता थेट जिल्हयाचे ठिकाण असलेल्या रत्नागिरी शहरालाही बसला आहे. रत्नागिरी शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. कोकणात मुसळधार पाऊस पडतो जिथे सर्वात जास्त पाऊस याची नोंद होते. त्याच रत्नागिरीत त्याच कोकणात आता एक दिवस आड पाणी पुरवठा केला जाणार आहे. पाणी पुरवठ्याचं नियोजन नसल्यामुळे ही वेळ आल्याची भावना रत्नागिरीतल्या नागरिकांमध्ये आहे. रत्नागिरी शहराला पानवल,शीळ, एमआयडीसी या तीन जलस्त्रोत मधून हा पाणीपुरवठा केला जात होता. परंतु, ८५ कोटी खर्च करून नळपाणी योजना कार्यान्वित करण्यात आल्यामुळे आता एमआयडीसीचे पाणी बंद करण्यात आले ,तसेच शीळ धरणातूनही पाणी घेणं बंद करण्यात आले. त्यामुळं सगळा भार पानवल धरणावर आल होता. या धरणातून औद्योगिक वसाहती बरोबर रत्नागिरी शहरातील नागरिकांना ही पाणीपुरवठा होतो.पानवल धरणातील पाणीसाठा फेब्रुवारीमध्ये पूर्णपणे संपला संपला होता. पानवल धरणातील धरणावरून नवीन जलशुद्धीकरण केंद्राच्या कामामुळे शहरात होणारा पाणीपुरवठा हा सप्टेंबर पासूनच बंद करण्यात आला. त्यामुळे नियोजित असलेल्या भागात केवळ शीळ धरण या धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्याने एमआयडीसी वरून होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. आता केवळ दहा टक्केच इतका पाणी पुरवठा सुरू आहे. संपूर्ण रत्नागिरी शहराला केवळ फक्त शीळ धरणावरूनच पाणीपुरवठा सुरू केला जात होता. मे महिना असून सुद्धा साधारण कोकणात रत्नागिरीत १० ते १५ जूनला पाऊस पडू शकतो याची जाणीव असल्यामुळे लांबलेले पर्जन्यमान व उष्ण तापमानामुळे पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे शहराचा मुख्य जलस्त्रोत असणाऱ्या धरणातील देखील पाणीपुरवठा वेगाने कमी होत आहे. सद्य स्थितीत केवळ धरणात ०.५८९ दशलक्ष लिटर इतकाच जिवंत पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा केवळ ५ जून पर्यंतच पुरू शकतो .यामुळे भविष्यातली पाणी टंचाई आणि लक्षात घेऊन नगरपरिषदेने शनिवार २१ मे पासून संपूर्ण पाऊस पडेपर्यंत संपूर्ण शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/JMoaCgH
No comments:
Post a Comment