Breaking

Monday, May 2, 2022

१८५७ च्या उठावात पण देवेंद्र फडणवीसांचं योगदान असेल, आदित्य ठाकरेंचा टोला https://ift.tt/ufYJcW0

मुंबई : बाबरीचा ढाचा कुणी पाडला, यावरुन सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये तू तू मैं मैं सुरु आहे. बाबरीचा ढाचा पाडला तेव्हा मी तिथे हजर होतो, एकही शिवसैनिक नेता तिथे हजर नव्हता, असा दावा काल मुंबईच्या सभेत बोलताना विरोधी पक्षनेते यांनी केला. फडणवीसांच्या याच दाव्याची मंत्री यांनी खिल्ली उडवली. १८५७ च्या उठावात पण देवेंद्र फडणवीसांचं योगदान असेल, असा टोला आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना लगावला. "अयोध्येत मशीद होती, हे मी मानत नाही. तो ढाचा होता. हिंदू कधी मशीद पाडू शकत नाही. तो ढाचा पाडण्याचं काम आम्ही केलंय, हे अभिमानाने सांगतो. तुम्ही आम्हाला विचारता, बाबरी पडली त्यावेळी तुम्ही कुठे होता...? मी अभिमानाने सांगतो, ज्यावेळी बाबरी पडली त्यावेळी मी त्याच ठिकाणी होतो. हा देवेंद्र फडणवीस बाबरीचा ढाचा पाडण्यासाठी त्याठिकाणी होता. एवढंच नाही तर राममंदिराच्या कारसेवेसाठी १८ दिवस बदायूच्या सेंट्रल जेलमध्ये घालवले, असा दावा काल फडणवीस यांनी मुंबईच्या सोमय्या मैदानावरील सभेत बोलताना केला. याच दाव्यावरुन आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना चिमटा काढला. १८५७ च्या उठावात पण देवेंद्र फडणवीसांचं योगदान असेल! आदित्य ठाकरे म्हणाले, "फडणवीस यांच्या दाव्यावर मी काही बोलणार नाही. १८५७ च्या उठावात पण देवेंद्र फडणवीसांचं कदाचित योगदान असेल... जाऊ द्या... सध्या राम मंदिर निर्माणाचं काम चांगलं सुरु आहे. देशात महागाई, इंधन दरवाढ भयंकर आहे. याविषयावर देखील राज्यातील विरोधी पक्षाने आणि केंद्रातील सत्ताधारी पक्षाने बोलायला पाहिजे" आदित्य ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला "महाविकास आघाडी सरकार अडलेल्यांना मदत करतंय. जनतेची सेवा करतंय. गोरगरिबांसाठी काम करतंय. म्हणजेच राज्यातील आघाडी सरकार जनतेची चूल पेटवण्याचं काम करतंय, पण राज्यातील काही विरोधक जनतेची घरं पेटविण्याचं कामं करतंय", असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/IrGpNMA

No comments:

Post a Comment