Breaking

Monday, May 2, 2022

धक्कादायक! मुलीशी बोलतो म्हणून मुलाला बेदम मारले; नंतर मुलाने जे काही केले ते ऐकून... https://ift.tt/wUlT4Ym

अकोला: ‘मला केली, माझी बदनामी झाली’, असा व्हिडीओ काढून दहाव्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलाने पाचव्या मजल्यावरून उडी घेत केल्याची धक्कादायक घटना अकोल्यात घडली आहे. आमच्या मुलीशी का बोलतो म्हणून सहा लोकांनी एका अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण केली होती. या घटनेनंतर माझा अपमान झाला, मला रहावे वाटत नाही, असे म्हणत या अल्पवयीन मुलाने राहत्या अपार्टमेंट'च्या पाचव्या मजल्यावरुन उडी घेतली. ही घटना आहे, शहरातील जठारपेठ भागातील महर्षी अपार्टमेंटमधील. सद्यस्थितीत सिव्हिल पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. (the boy was beaten for not talking to the girl after which the boy committed ) सुभाष मुदगल (वय १७ रा. जठारपेठ महर्षी अपार्टमेंट) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. २६ एप्रिल रोजी दुपारी दोन ते तीन वाजता दरम्यान युवकाने तो राहत असलेल्या अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेतली. त्यात त्याचा मृत्यू झाला. मुलीशी बोलला म्हणून माझ्या मुलाला सहा लोकांनी मारहाण केल्याने त्याने आत्महत्या केली असा आरोप मुलाच्या आईने केला आहे. या याप्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन देखील करण्यात आले आहे. वैद्यकीय अहवालानंतर पुढील तपास केला जाणार, असे सिव्हिल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भानुप्रताप मडावी यांनी सांगितले. दरम्यान आतापर्यंत या प्रकरणी कोणालाही ताब्यात घेतले नाही. क्लिक करा आणि वाचा- येथे झाली मारहाण २६ एप्रिल रोजी काहीजणांनी अक्षयला दत्त मंदिराजवळ मारहाण केली. त्यानंतर तो घरी आला आणि त्याने त्याच्या मावसभावाला फोन करून आत्महत्या करतो असे सांगितले. त्यानंतर दुपारी त्याने टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला आहे. क्लिक करा आणि वाचा- आत्महत्येपूर्वी 'अक्षय'ने बनवला व्हिडिओ मृत्यूपूर्वी अक्षयने एक व्हिडिओही केला. त्यात तो रडत आहे आणि आपल्याला मारहाण केल्याने बेइज्जती झाली, आता मी आत्महत्या करतो, असे त्याने त्यात म्हटले आहे. माझा अपमान झाला, मला रहावे असे वाटत नाही, असेही त्याने व्हिडिओत म्हटले आहे. माझ्या डोक्यावर मारले, डोळ्यावर मारले. ही मारहाण पाहायला खूप लोक होते. माझी बदनामी झाली, आता चाललोय, कधीच परत येणार नाही, असे अक्षयने पुढे व्हिडिओत म्हटले आहे. दरम्यान, अक्षयवर हल्ला करणारे कोण लोक आहेत समजलेले नाही. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/kgOrGZ4

No comments:

Post a Comment