मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र, माजी खासदार () यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष () यांच्यावर हल्लाबोल केला आहे. "आपण शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, कष्टकऱ्यांचे प्रश्न याविषयी बोलता, मग मला एक प्रश्न पडतो, ४ वेळा मुख्यमंत्री, २० वर्ष केंद्रात मंत्री, ५० वर्ष आमदार, एवढ्या वर्षात आपण काय केलं?", असा सवालच त्यांनी शरद पवार यांना विचारला आहे. लागोपाठ ३ ट्विट करुन त्यांनी शरद पवार यांना लक्ष्य केलं आहे. निलेश राणेंचा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल ४ वेळा मुख्यमंत्री, जवळपास २० वर्ष केंद्रात मंत्री, पन्नास वर्ष आमदार किंवा खासदार, अनेक संस्थांवर अध्यक्ष तरी पवार साहेब बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या वगैरेवर भाष्य करतात. मग प्रश्न पडतो इतके वर्ष तुम्ही काय केलं? तेव्हा काहीतरी केलं असतं तर लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं, असं निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. निलेश राणेंचा शिवसेनेला टोला "मुंबईची व महाराष्ट्राची सगळी कामं पूर्ण झाली आहेत, एकही काम शिल्लक नाही म्हणून शिवसेनेचे नेते मंडळी नवनीत राणा MRI मशीन मध्ये त्यांची तपासणी होताना बाहेरून फोटो कोणी काढला हे शोधण्यासाठी स्वतः लीलावती हॉस्पिटलला गेले, हा प्रश्न महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा व गंभीर झाला आहे", असा टोला नितेश राणे यांनी शिवसेनेला लगावला आहे. 'कामगारांसाठी सेना नेते आले नाही पण राणांसाठी आले' "लीलावती हॉस्पिटलमध्ये शिवसेनेची भारतीय कामगार सेना युनियन आहे, मागच्या ३ वर्षापासून कर्मचारी युनियनशी जोडलेले आहेत, सातत्याने कराराबद्दल तक्रारी व मॅनेजमेंट सोबत मिटिंग करावी यासाठी नेत्यांकडे ३ वर्ष विनंती करतायत. अखेर सेनेची मंडळी आली पण कर्मचाऱ्यांसाठी नाही तर नवनीत राणांसाठी", असा टोलाही निलेश राणेंनी लगावला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Rwm0osF
No comments:
Post a Comment