Breaking

Friday, May 27, 2022

प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी, जमणार या कलाकारांच्या जोड्या https://ift.tt/wGSde2y

मुंबई टाइम्स टीम सिनेमागृह निर्बंधमुक्त झाल्यानंतर बॉलिवूडची गाडी सुसाट धावतेय. काही सिनेमे प्रदर्शनासाठी सज्ज आहेत तर काहींची नावं जाहीर झाली आहेत. आगामी काळातील बॉलिवूडच्या नव्या सिनेमांत प्रेक्षकांनी आतापर्यंत न पाहिलेल्या जोड्या त्यांचं मनोरंजन करण्यासाठी येणार आहेत. नव्या जोड्या पडद्यावर आणत प्रेक्षकांना तिकीटबारीवर खेचून आणण्याचा प्रकार बॉलिवूडला नवा नाही. मात्र येत्या काळात एक-दोन नाही तर तब्बल एक डझनपेक्षा अधिक नव्या जोड्या प्रेक्षकांना पडद्यावर बघायला मिळणार आहेत. यात अनेक नावाजलेले कलाकार असून एकमेकांबरोबर आजवर काम न केलेल्या जोड्या दिसतील. तर नव्या फळीतील कलाकारांच्या नव्या जोड्यांचे प्रयोग होतील. यात कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी या नव्या फळीतील नव्या जोडीचा 'भुलभूलैय्या २' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. तर मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर अक्षयकुमारसारख्या अनुभवी अभिनेत्याबरोबर आगामी सिनेमातून पदार्पण करणार आहे. 'भूल भुलैय्या २'पासून बॉलिवूडमध्ये पुन्हा नव्या जोड्या जमायला सुरुवात झाली असून आगामी काळात प्रेक्षकांसाठी नाविन्याची मेजवानी असणार आहे. मागणी आणि पुरवठा प्रेक्षक अनेकदा ते पडद्यावर पाहू इच्छिणाऱ्या जोड्यांची मागणी सोशल मीडियावर करतात. आता बॉलिवूड प्रेक्षकांच्या अनेक मागण्यांची दखल घेण्यात येणार आहे. यामध्ये नुकतंच लग्न झालेले रणबीर कपूर आणि आलिया भट यांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्याची प्रेक्षकांची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. दोघंही 'ब्रह्मास्त्र' या सिनेमातून मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. तर गेली अनेक वर्षं बॉलिवूडमध्ये काम करूनही हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण हे दिग्गज कलाकार एकत्र कधी काम करणार असा प्रेक्षकांचा प्रश्न होता. लवकरच प्रेक्षकांची प्रतीक्षा संपणार आहे. हृतिक-दीपिकाची केमिस्ट्री 'फायटर' या सिनेमातून पाहायला मिळणार आहे. नवे गडी नव्या जोड्या बॉलिवूडच्या नव्या फळीतील अनेक नवे चेहरे येत्या काळात पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. वरुण धवन आणि जान्हवी कपूर 'बवाल' या सिनेमातून प्रथमच एकत्र काम करणार आहेत. तर वरूण कियारा अडवाणीसह 'जुग जुग जियो' या सिनेमात पहिल्यांदा एकत्र दिसणार आहे. सारा अली खान आणि विकी कौशल या नव्या जोडीनं लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित त्यांच्या पहिल्या सिनेमाचं चित्रीकरण संपवलं आहे. आयुषमान खुराना आणि रकुलप्रीत सिंग ही जोडी 'डॉक्टर जी' या सिनेमातून तर रणवीर सिंग आणि जॅकलिन फर्नांडिस ही जोडी 'सर्कस' या सिनेमातून पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. तर सान्या मल्होत्रा आणि विकी कौशल हे दोघं 'सॅम बहादूर' या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. बॉलिवूड-साऊथची जोडी आगामी काळात बॉलिवूड आणि साऊथच्या नव्या जोड्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. यात दाक्षिणात्य स्टार विजय देवरकोंडा हा 'लायगर' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये दिसणार असून तो प्रथमच अनन्या पांडेबरोबर एकत्र दिसणार आहे. तर रश्मिका मंदना 'मिशन मजनू' या सिनेमातून सिद्धार्थ मल्होत्रासह एकत्र दिसेल. रश्मिका रणबीर कपूरबरोबर 'ॲनिमल' या सिनेमात तर कतरिना कैफ दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेथुपतीबरोबर 'मेरी ख्रिसमस' या सिनेमात दिसणार आहे. यासह क्रिती सेनॉन आणि प्रभास हे बहुचर्चित 'आदिपुरुष' सिनेमातून एकत्र दिसणार आहेत. संकलन : प्रथमेश गायकवाड, मुंबई विद्यापीठ


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/DjPSbwl

No comments:

Post a Comment