Breaking

Tuesday, May 17, 2022

तीन महिन्यांनंतरही कुणी दखल घेतली नाही; जयप्रभाप्रश्नी आंदोलन सुरूच https://ift.tt/YR9bXn2

म. टा. प्रतिनिधी, जयप्रभा स्टुडिओची (Jayprabha Studio) जागा सरकारने ताब्यात घेऊन ती चित्रीकरणासाठी पुन्हा खुली करावी या मागणीसाठी तब्बल तीन महिन्यानंतरही सुरूच आहे. लोकप्रतिनिधी आंदोलनस्थळी भेट देवून आश्वासन देण्यापलिकडे काहींच करत नसल्याने आता आंदोलनाची जागा बदलून शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (agitation continues on issue in kolhapur) लता मंगेशकर यांच्या मालकीची असलेला दोन वर्षापूर्वी कोल्हापुरातील काहीं बांधकाम व्यावसायिकांनी खरेदी केली. दोन वर्षानंतर हा व्यवहार उघडकीस आला. यामुळे ती जागा सरकारने ताब्यात घ्यावी, तेथे चित्रीकरणास परवानगी द्यावी म्हणून रंगकर्मी स्टुडिओच्या दारात आंदोलन करत आहेत. तीन महिने उलटले तरी या आंदोलनाची दखल कुणीच घेतली नाही. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या पुढाकाराने हे आंदोलन सुरू आहे. क्लिक करा आणि वाचा- रोज सिने क्षेत्रातील कलावंत दिवसभर येथे बसून आंदोलन करतात. आंदोलन ठिकाणी अनेक नेत्यांनी भेट दिली. पण सर्वांनी केवळ आश्वासन दिल्याने कोणताच निर्णय झाला नाही. ज्यांनी हा स्टुडिओ विकत घेतला आहे, त्यांनी पर्यायी जागा मागितली आहे. त्याला महापालिकेने असमर्थता दाखविली आहे. यामुळे हा प्रश्न तीन महिन्यानंतरही प्रलंबित राहिला आहे. क्लिक करा आणि वाचा- आंदोलनाची कुणीच दखल घेत नसल्याच्या पार्श्वभूमीवर आता महामंडळाने आंदोलनाचे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी हे ठिय्या आंदोलन छत्रपती शिवाजी चौकात होणार आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी केले आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/jl5KF8i

No comments:

Post a Comment