Breaking

Tuesday, May 31, 2022

Video: दुषित पाणी पुरवठ्यावरुन नागरिक आक्रमक; महापालिका अधिकाऱ्याला प्यायला लावले गढूळ पाणी https://ift.tt/dAVRoxz

जळगाव : शहरात दुषित पाणी पुरवठ्यावरुन नागरिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. जुने जळगावमधील रहिवाशांनी सोमवारी महापालिकेवर धडक मोर्चा काढला. यावेळी महाभसा सुरु असतांना सभागृहासमोर ठिय्या मांडलेल्या संतप्त नागरिकांनी महासभा संपताच महापौर जयश्री महाजन व आयुक्त विद्या गायकवाड यांना घेराव घातला. महिलांनी दुषित पाणी एका बाटलीमध्ये आणले होते. हे पाणी अधिकाऱ्यांनी सुध्दा पिऊन दाखवावे, असे आंदोलकांनी आव्हान दिले. त्यानंतर एका अधिकाऱ्यासह नगरसेवकांनी आंदोलक रहिवाश्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. शेवटी त्या अधिकाऱ्याने आंदोलक रहिवाश्यांनी आणलेले पाणी पिऊन दाखविले. जुने जळगाव परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अनियमित आणि गढूळ पाणी पाणी पुरवठा होत आहे. कधी-कधी बारीक जंत असलेले पाणी सुध्दा येत आहे. यामुळे अनेक नागरिकांना पोटाच्या विकारांची लक्षणे जाणवत आहे. मात्र, तक्रारीं करून सुध्दा कुणी दखल घेत नाही म्हणून आज सोमवारी दुपारी १२ वाजता जुने जळगावातील रहिवाशांनी मनपावर मोर्चा काढला. मनपाच्या प्रवेशद्वारासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्यानंतर आयुक्तांनी रहिवाश्यांच्या समस्या ऐकून घ्यावी आणि निवेदन स्वीकारावे अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, महासभा सुरू असल्यामुळे आयुक्त, महापौर निवेदन स्वीकारण्यासाठी न आल्यामुळे जुने जळगावातील रहिवाश्यांनी चक्क मनपाच्या सभागृहाबाहेर ठिय्या मांडला. तब्बल दोन ते अडीच तास रहिवाश्यांनी ठिय्य मांडून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. महासभा संपल्यानंतर रहिवाश्यांनी आयुक्त, महापौर यांनी घेराव घालून त्यांच्या संपूर्ण समस्या सांगितल्या. त्यानंतर आयुक्तांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/I9Ffwbd

No comments:

Post a Comment