Breaking

Monday, June 20, 2022

BCCIने जर ही एकच गोष्ट केली असती तर पाचवा सामना रद्द झाला नसता, पाहा काय करायला हवं होतं... https://ift.tt/FASnx7X

बेंगळुरू : भारत आणि दक्षिण यांच्यातील पाचवी टी-२० क्रिकेट लढत पावसामुळे पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे भारतीय क्रिकेट बोर्डाने पाऊस आल्यास स्टेडियम आच्छादित होऊ शकेल अशी मैदाने उभारण्याची सूचना पुन्हा करण्यात आली. भारतीय बोर्डाने स्टेडियमवर हा खर्च करावा अशीही सूचना करण्यात आली आहे. जर हे स्टेडियम आच्छादित असले असते तर हा सामना रद्द करण्याची वेळच आली नसती. बेंगळुरूमधील पाचव्या सामन्यापूर्वी मालिका २-२ अशी बरोबरीत होती. पाचव्या सामन्यात केवळ ३.३ षटकांचाच खेळ झाला. संयोजक कर्नाटक क्रिकेट संघटनेने चाहत्यांना तिकीटाच्या रकमेचा परतावा देणार असल्याचे जाहीर केले, पण चाहत्यांना खेळांच्या आनंदापासून रोखणे योग्य नव्हे. आवश्यकता भासल्यास स्टेडियम आच्छादित करण्याची सुविधा असावी अशी सूचना करण्यात आली. भारतीय क्रिकेट बोर्डाने स्टेडियम आच्छादित करण्याकडे लक्ष द्यावे. त्यांनी किमान काही स्टेडियममध्ये ही गुंतवणूक करावी. भारतीय क्रिकेट बोर्डाने प्रक्षेपणाचे हक्क विकून मोठ्या प्रमाणावर कमाई केली आहे. या परिस्थितीत प्रतिकुल हवामानाचा सामन्यावर कोणताही परिणाम कसा होणार नाही, याकडे बोर्डाने लक्ष द्यायला हवे, अशी सूचना माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी केली. इंग्लंडच्या केविन पीटरसन यांनीही चोप्रा यांच्या सूरात सूर मिसळला आहे. त्यांनी स्टेडियम प्रेक्षक तसेच खेळाडूंसाठी सुकर कशी होतील, याकडे लक्ष देण्याची सूचना केली. त्याचबरोबर आयपीएलच्या माध्यम हक्काच्या विक्रीतून मिळालेल्या रकमेचा यासाठी उपयोग करण्याची सूचनाही केली आहे. आयपीएलच्या सामन्याच्या प्रसारणाचे हक्क खूप मोठ्या प्रमाणावर विकले गेले आहेत. ही रक्कम पाहिल्यावर भारतीय क्रिकेट बोर्ड प्रेक्षक, खेळाडूंसाठी स्टेडियममध्ये अधिक चांगल्या सुविधा देईल, अशीच अपेक्षा करणे यात काही गैर नाही. भारत क्रिकेटमधील मोठी ताकद आहे. त्यांनी आदर्श स्टेडियम कशी असावीत हे जगाला दाखवून द्यायला हवे, असे पीटरसन यांनी सांगितले. पीटरसन यांच्या सूचनेचे चाहत्यांनी स्वागत केले. समाज माध्यमांवर अनेक चाहत्यांनी स्टेडियममध्ये आपल्याला किती त्रास होतो, याकडे लक्ष वेधले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/XiBsNOy

No comments:

Post a Comment