पिंपरी : विधानपरिषद निवडणुकीचे () निकाल घोषित झाले असून या या निवडणुकीत भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे (Uma Khapre) यांचा दणदणीत विजय झाला आहे. या विजयामुळे खापरे या आता पिंपरी चिंचवडच्या भाजपच्या पहिल्या महिला आमदार ठरल्या आहेत. एक ओबीसी चेहेरा म्हणून त्यांना संधी देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. ( has become the first woman mlc of pimpri chinchwad) राज्य सभेच्या निवडणुकीनंतर विधानपरिषदेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपनेच बाजी मारल्याचे पहायला मिळाले आहे. या निवडणुकीत भाजपचे ५ उमेदवार निवडून आले आहेत. तर, या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी २-२ उमेदवार निवडून आले आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांना विजय झाला असून, काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला आहे. क्लिक करा आणि वाचा- विधान परिषदेच्या एकूण १० जागांसाठी आज निवडणूक पार पडली. यात २८५ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मात्र, या निवडणूक प्रक्रियेत दोन मते बाद झाल्याने एकूण २८३ मते वैध ठरवण्यात आली. क्लिक करा आणि वाचा- उमा खापरे यांची राजकीय कारकिर्द पिंपरी चिंचवड महापालिकेत उमा खापरे या दोन वेळा नगसेविका म्हणून निवडून आलेल्या आहेत. १९९७-२००२ या कालावधीत त्यांनी नगरसेविका म्हणून महापालिकेत काम केले आहे. उमा खापरे या गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ भाजपसोबत काम करत आहेत. तसेच त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत विरोधी पक्षनेत्या म्हणूनही काम केलेले आहे. भाजपच्या पुणे जिल्हा सरचिटणीस, महिला मोर्चा पदाधिकारी, प्रदेश सरचिटणीस, प्रदेश उपाध्यक्षा, महिला प्रदेशाध्यक्षा अशी विविध आणि महत्वाची पदेही त्यांनी भूषविली आहेत. आता त्या विधानपरिषदेत आमदार म्हणून काम करणार आहेत. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/PWfcxUe
No comments:
Post a Comment