नवी दिल्ली : भारताला टोकिओ ऑलम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्रानं आणखी एकदा सुवर्णमय कामगिरी केली आहे. फिनलँडमध्ये सुरु आसलेल्या कुओर्ताने गेम्समध्ये नीरज चोप्रानं सुवर्णपदक जिंकलं आहे. नीरज चोप्रानं या स्पर्धेत ८६.८९ मीटर अंतरावर भाला फेकला. दुसरे स्पर्धक नीरज चोप्राची बरोबरी देखील करु शकले नाहीत. काही दिवसांपूर्वी नीरज चोप्रानं नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता. नीरज चोप्रानं फिनलँडमध्ये सुरु असलेल्या कुओर्ताने स्पर्धेतील पहिल्या फेरीतचं ८६.८९ मीटर अंतरावर भाला फेकला. नीरज चोप्रासोबत स्पर्धेत असलेल्या इतर खेळाडूंना त्या अंतराला पार करता आलं नाही. नंतरच्या वेळी नीरज चोप्रानं पुढील दोन प्रयत्न फाऊल केले. कारण, दुसऱ्यांदा फेकलेला भाला कमी अंतरावर पडल्यास नुकसान होण्याची शक्यता होती. दरम्यान नीरज चोप्रा जखमी देखील झाला होता. भालाफेक करताना नीरजचा पाय घसरला होता. मात्र, त्यानं हार मानली नाही. नीरज चोप्रानं सुवर्णपदक मिळवल्याबद्दल केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी देखील अभिनंदन केलं आहे. नीरज चोप्राचा व्हिडिओ ट्वट करत नीरज चोप्राला सुवर्णपदक मिळालं असल्याचं ते म्हणाले. नीरज चोप्रानं पुन्हा एकदा करुन दाखवलं आहे, असं अनुराग ठाकूर म्हणाले. चार दिवसांपूर्वी स्वत:चा विक्रम मोडला टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवणाऱ्या नीरज चोप्राने नवा राष्ट्रीय विक्रम केलाय. पण स्वत:चा राष्ट्रीय विक्रम मोडल्यानंतर देखील नीरजला सुवर्णपदक जिंकता आले नाही. फिनलँडमधील पावो नुरमी गेम्समध्ये नीरजने ८९.०३ मीटर लांब थ्रो केला. याआधी त्याने ८७.५८ मीटर लांब भाला फेकला होता. गेल्या वर्षी टोकियोतील या कमगिरीने त्याला ऑलिंपिकमधील सुवर्णपदक मिळाले होते. नीरज चोप्रानं गेल्या वर्षी टोकिओ ऑलम्पिकमध्ये भारताला भालाफेक स्पर्धेत पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं होतं. नीरज चोप्राच्या या कामगिरीनिमित्त देशभरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षावर करण्यात आला होता. नीरज चोप्रानं फिनलँडमधील स्पर्धेत मिळवलेल्या यशावरुन त्यानं सातत्यानं यशस्वी कामगिरी करण्याकडे लक्ष दिल्याचं दिसून येतं.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/6ML9RDc
No comments:
Post a Comment