Breaking

Saturday, June 18, 2022

चित्रा वाघ यांना शॉर्टकट वापरुन मोठ व्हायचंय, विद्या चव्हाण यांचा आरोप https://ift.tt/k6AqZ3u

: राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा यांनी नेत्या यांच्यावर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला. चित्रा वाघ यांना शॉर्टकटचा वापर करुन मोठं व्हायचंय, अशी टीका चव्हाण यांनी केलीय. विद्या चव्हाण यांनी यावेळी महागाई, पेट्रोल डिझेल दरवाढ, अग्निपथ योजना, दहा लाख नोकऱ्या यावरुन मोदी सरकारवर देखील टीका केली. विद्या चव्हाण नेमकं काय म्हणाल्या? चित्रा वाघ यांच्यासंदर्भात बोलताना विद्या चव्हाण यांनी सरशी तशी पारशी असं म्हटलं जातं त्याप्रमाणं चित्रा वाघ यांची अवस्था असल्याचं म्हटलं. चित्रा वाघ यांना काहीतरी पाहिजे त्यामुळं मोठ्या नेत्यांशी जवळीक साधून त्या मोठ्या झाल्या आहेत. मला त्यांच्यावर काही बोलायचं नाही. आम्ही तळागाळात काम करुन वर आलो, असल्याचं विद्या चव्हाण म्हणाल्या. राष्ट्रवादी महिला आघाडी महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्यावर आक्रमक होणार नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं होतं याची आठवण करुन देत विद्या चव्हाण यांनी टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीकडून पावसाळ्यानंतर महागाई आणि बेरोजगारी या दोन मुद्यांवर आक्रमक भूमिका घेणार असल्याचं विद्या चव्हाण यांनी सांगितलं. महाविकास आघाडीत जराही विसंवाद नाही, मात्र, तसं चित्र रंगवलं जातं, असं विद्या चव्हाण म्हणाल्या. महाविकास आघाडीत काहीतरी धुसफूस आहे, असं चित्र रंगवलं जात मात्र बिल्कूल तसं नाही. महाराष्ट्रात भाजपला पुढच्या ५० वर्षांमध्ये सत्ता मिळणार नाही. भाजपनं गोपीचंद पडळकर आणि राणे साहेबांची मुलं राष्ट्रवादीवर बोलण्यासाठी घेतली आहेत, असं विद्या चव्हाण म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण आणि चित्रा वाघ यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. चित्रा वाघ यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा होत्या. चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रुपाली चाकणकर यांच्याकडे अध्यक्षपद देण्यात आलं. रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी वर्णी लागल्यानंतर त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर विद्या चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद देण्यात आलं आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/147AzTH

No comments:

Post a Comment