Breaking

Monday, June 20, 2022

राज ठाकरेच्या मर्जीतले नेते ते फडणवीसांचे विश्वासू, प्रविण दरेकर दुसऱ्यांदा परिषदेवर https://ift.tt/9JROFie

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतील १० जागांसाठी निवडणूक पार पडलीआहे. भाजपनं या निवडणुकीत ५ जणांना उमेदवारी दिली होती. प्रविण दरेकर, राम शिंदे, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, विधानपरिषद निवडणूक लढवत होते. विधानपरिषद निवडणुकीत भाजपसाठी हे महत्त्वाचे उमदेवार होते. प्रविण दरेकर मतमोजणीच्या पहिल्या फेरीत विजयी झाले आहेत. प्रविण दरेकर यांच्यासह भाजपचे श्रीकांत भारतीय, राम शिंदे, उमा खापरे देखील पहिल्या फेरीत विजयी झाले आहेत. प्रविण दरेकरांचं विरोधीपक्षनेतेपद कायम राहणार राज्यात २०१९ मध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलं. प्रविण दरेकर हे २०१९ पासून विरोधी पक्षनेते काम करत आहेत. आता प्रविण दरेकर निवडणुकीत विजयी झाल्यानं त्यांचं विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते पद कायम राहणार आहे. शिवसेनेतून राजकीय कारकीर्द सुरुवात प्रविण दरेकर यांनी मुंबईत आल्यानंतर शिवसेनेतून राजकीय कार्याला सुरुवात केली. राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील भारतीय विद्यार्थी सेनेत प्रविण दरेकर कार्यरत होते. राज ठाकरे यांनी पुढील काळात शिवसेना सोडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस म्हणून दरेकर यांनी काम केलं. मनसेच्या अनेक आंदोलनामध्ये प्रविण दरेकर यांचा पुढाकार होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं २००९ ची विधानसभा निवडणूक जोरदार पणे लढवली. प्रविण दरेकर यांना मनसेनं मागाठणे मतदारसंघातून उमेदवारी दिली. २००९ मध्ये प्रविण दरेकर यांनी विधानसभेत विजय मिळवला. २०१४ ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं प्रविण दरेकर यांना उमेदवारी दिली. मात्र, शिवसेनेच्या प्रकाश सुर्वे यांनी प्रविण दरेकर यांना पराभूत केलं. प्रविण दरेकर भाजपमध्ये २०१५ मध्ये प्रविण दरेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत कार्यरत असताना मुंबै बँकेतील एक प्रकरण चर्चेत आलं. प्रविण दरेकर यांनी पुढे भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रविण दरेकर यांचं महत्त्व वाढलं. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून प्रविण दरेकर ओळखले जाऊ लागले. २०१६ मध्ये भाजपनं प्रविण दरेकर यांना विधानपरिषदेवर संधी दिली. २०१९ मध्ये विरोधी पक्षनेतेपदी संधी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं एकत्र येत सत्ता स्थापन केली. भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलं. विधानसभेत भाजपकडून देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असतील हे निश्चित होतं. विधानपरिषदेत कुणाला विरोधीपक्षनेते म्हणून संधी देणार याची चर्चा होती. अखेर भाजपनं प्रविण दरेकर यांच्या नावाची घोषणा केली. २०१९ पासून प्रविण दरेकर प्रभावीपणे विरोधी पक्षनेते म्हणून कार्यरत आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/xt7ic2q

No comments:

Post a Comment