मुंबई : शिवसेनेकडून पुणे संपर्कप्रमुख यांना तिकीट देण्यात आलं होतं. २०१९ मधील विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकून त्यांनी शिवबंधन हाती बांधलं होतं. आदित्य ठाकरे यांच्या विजयात अहिर यांचा मोलाचा वाटा मानला जातो. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेने अहिर यांचे हात बुलंद केल्याचं चित्र आहे. कोण आहेत सचिन अहिर? सचिन अहिर आणि त्यांच्या पत्नीने श्री संकल्प प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. वरळी फेस्टिव्हल आणि दहीहंडीच्या काळात भव्य स्पर्धा ते आयोजित करत असत. १९९९ मध्ये सचिन अहिर पहिल्यांदा राष्ट्रवादीच्या तिकिटावर विधानसभेवर निवडून आले होते. त्यानंतर २००४ आणि २००९ मध्ये ते पुन्हा विजयी झाले. २००९ मध्ये त्यांच्यावर गृहनिर्माण मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाची धुरा होती. २०१४ मध्ये त्यांना शिवसेना उमेदवार सुनील शिंदे यांच्याकडून पराभवाचा धक्का बसला. २०१९ मधील विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला होता. त्यावेळी ते मुंबई राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी होते. आदित्य ठाकरे यांना वरळी मतदारसंघातून विजयी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. आदित्य ठाकरेंसाठी मैदान मोकळं केल्याची त्यांना बक्षिसी मिळताना दिसत आहे. २०२० मध्येच त्यांना शिवसेना उपनेतेपद बहाल करण्यात आलं होतं, तर २०२१ त्यांना प्रवक्तेपद देण्यात आलं होतं. आता त्यांची विधान परिषदेवर नियुक्ती झाली आहे. सचिन अहिर यांच्यामुळे वरळी विभागाला तिसरा आमदार मिळाला आहे. विशेष म्हणजे तिन्ही आमदार शिवसेनेचेच आहेत. पर्यटन मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. तर यावर्षीच आधी विधानपरिषदेवर निवडून गेलेले सुनील शिंदे आणि आता सचिन अहिर यांचं कार्यक्षेत्र वरळीच आहे. हेही वाचा : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतील १० जागांसाठी सकाळपासून दुपारी चार वाजेपर्यंत मतदान झालं. सर्वपक्षीय २८५ आमदारांनी या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. काँग्रेसने भाजपचे दोन आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या मतदानावर आक्षेप घेतल्याने मतमोजणी सुरु होण्यास दोन तास विलंब झाला. राज्य निवडणूक आयोगाने आक्षेप निकाली काढल्यानंतर पाचऐवजी सात वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणी सुरु असतानाच राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कोट्यातील मतावर भाजप नेते आशिष शेलार यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर भाजप उमेदवार उमा खापरे यांच्या कोट्यातील एका मतावरही महाविकास आघाडीकडून आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये काही काळ खडाजंगी झाली. सुरुवातीला ही मतं बाजूला काढून ठेवण्यात आली होती. अखेर मतपत्रिकेतील खाडाखोडीमुळे दोन्ही मतं बाद ठरवण्यात आली. त्यामुळे २८३ मतं वैध ठरली. परिणामी प्रत्येक उमेदवारासाठी पहिल्या पसंतीचा कोटा २५.७१ म्हणजेच २६ इतका झाला. त्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी या दोघांनीही या निर्णयावर आक्षेप घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जाण्याची तयारी दाखवली. हेही वाचा : ही निवडणूक महाविकास आघाडी आणि भाजप दोघांसाठीही प्रतिष्ठेची होती. त्यामुळे सर्वच पक्षांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत नेत्यांचे प्रयत्न, अपक्षांच्या भेटीगाठी सुरु होत्या, तर आमदार फुटू नये यासाठीही संपूर्ण खबरदारी घेण्यात आली होती. यावेळी सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप दोघांनीही त्यांचे उमेदवार निवडून येण्याचा दावा केला होता. हेही वाचा : राष्ट्रवादीने अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी मिळवण्यासाठीही प्रयत्न केले, मात्र सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीची आशा मावळली. त्यानंतर ४ वाजेपर्यंत २८५ आमदारांचं मतदान पूर्ण झालं होतं. सायंकाळी ५ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार अशी आशा होती. मात्र, काँग्रेसने भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर आक्षेप घेतला. त्यांची मतपत्रिका दुसऱ्याने मतपेटीत टाकल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. त्यामुळे मतमोजणीला विलंब झाला. राज्य निवडणूक आयोगाने काँग्रेसचा आक्षेप फेटाळून लावल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणी सुरु असतानाच राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कोट्यातील मतावर आशिष शेलार यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर भाजप उमेदवार उमा खापरे यांच्या कोट्यातील एका मतावरही महाविकास आघाडीकडून आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये काही काळ खडाजंगी झाली. सुरुवातीला ही मतं बाजूला काढून ठेवण्यात आली होती. अखेर मतपत्रिकेत खाडाखोड केल्याच्या कारणावरुन दोन्ही मतं बाद ठरवण्यात आली. त्यामुळे २८३ मतं वैध ठरली. परिणामी प्रत्येक उमेदवारासाठी पहिल्या पसंतीचा कोटा २५.७१ इतका झाला. त्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी या दोघांनीही या निर्णयावर आक्षेप घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जाण्याची तयारी दाखवली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/o0B6DWf
No comments:
Post a Comment