Breaking

Tuesday, June 14, 2022

संसदेचं पावसाळी सत्र १८ जुलैपासून सुरु होणार? राष्ट्रपती उपराष्ट्रपती निवडणुकीमुळं महत्त्व https://ift.tt/A8qlXbj

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात १८ जुलै रोजी होणार असल्याची शक्यता आहे. १८ जुलैपासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप १२ ऑगस्ट रोजी होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात १८ जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीद्वारे होईल. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राष्ट्रपती निवडणुकीसोबत उपराष्ट्रपती पदाची निवडणूक देखील पार पडणार आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपणार आहे. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. यावेळी राज्यसभेचे महासचिव हे राष्ट्रपती निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. तर, लोकसभेचे महासचिव हे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी असतील. संसदेतच राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडेल. संसदेचं पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून सुरु होणार सर्वसाधारणपणे संसदेचं पावसाळी अधिवेशन जुलै महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात सुरु होतं आणि ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये संपतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ससंदीय प्रकरणांच्या मंत्रिमंडळाच्या समितीनं मान्सून सत्र १८ जुलै ते १२ ऑगस्ट या दरम्यान आयोजित करण्याची शिफारस केली आहे. उपराष्ट्रपती राष्ट्रपतीपदाची निवडणूक राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पावसाळी अधिवेशनाच्या काळात पार पडण्याची शक्यता आहे. तर, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी १८ जुलै रोजी मतदान होईल, तर २१ जुलै रोजी मतमोजणी पार पडेल. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपणार आहे. संसदीय समितीकडे पाठवलेली ४ विधेयके सभागृहात मंजुरीसाठी येण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. भाजप आणि विरोधी पक्षांनी देखील राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. तर, भाजपकडून राजनाथ सिंह यांच्यावर राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्यसभा निवडणूक नुकतीच पार पडली असून यामध्ये विजयी झालेल्या उमेवारांचा शपथविधी सोहळा देखील पावसाळी अधिवेशनात पार पडेल. ५७ जागांसाठी राज्यसभा निवडणूक पार पडली होती.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/1FlJzM6

No comments:

Post a Comment