Breaking

Tuesday, June 14, 2022

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे वक्तव्य खटकले; दानवे यांचे जोरदार टीकास्त्र https://ift.tt/MPlv49W

औरंगाबाद : राज्यपालांनी औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्नावर बोलणे म्हणजे अजाणतेपणाचे लक्षण आहे, अशा शब्दात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यांनी राज्यपालांवर टीका केली आहे. आज मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबादच्या पाणी प्रश्‍नाच्या वादात उडी घेत मुख्यमंत्र्यांना समोरच 'मोदी हैं तो मुमकिन हैं', पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात निकाली निघेल, असे वक्तव्य केले होते. यावरून शिवसेनेच्या वतीने राज्यपालांवर टीकास्त्र सोडण्यात आले. आमदार दानवे म्हणाले की, औरंगाबादच्या पाणीप्रश्नावर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडेय, हे तीन आयएएस दर्जाचे अधिकारी काम करत असताना यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. नागरिकही हळूहळू समाधानी होताना दिसत आहे. औरंगाबाद प्रमाणेच सोलापूर आणि धुळे देखील पाणी प्रश्न आहे. परंतु, येथे भाजपचे महापौर असल्याने राज्यपालांनी यावर मुद्दामून बोलणे म्हणजे राजकारण करणे आहे. क्लिक करा आणि वाचा- 'हा तर महाराष्ट्रातील जनतेचा अपमान' महाविकासआघाडी आणि शिवसेना यांच्याविरोधात राज्यपाल सातत्याने बोलतच असतात. राज्यपाल ज्याप्रमाणे पाणीप्रश्नावर बोलले त्याच प्रमाणे त्यांनी महागाई, पेट्रोल, गॅस दरवाढ आणि बेरोजगारीवरही बोलायला पाहिजे होते. संपूर्ण माहिती न घेता अशा प्रकारचे वक्तव्य करणे म्हणजे महाराष्ट्रातील जनतेचा अपमान असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी पुढे म्हटले आहे. क्लिक करा आणि वाचा- काय म्हणाले राज्यपाल ? राज्याचे यांनी औरंगाबादच्या पाणीप्रश्नावर भाष्य केले आहे. औरंगाबादचा पाणीप्रश्न हा गंभीर बनला असल्याचे सांगत सात-सात दिवसांनंतर शहराला पाणी पुरवठा होतो आणि हे योग्य नाही अशा शब्दात राज्यपाल कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा प्रश्न सोडवावा अशी विनंती करतानाच मोदी हैं तो मुमकीन हैं, असे भाष्य त्यांनी केले होते. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Zjm5QML

No comments:

Post a Comment