सांगली : पोलीस उपनिरीक्षक आणि ५० एकर जमिनीचा मालक असल्याचे भासवून तरुणीशी केले, त्यानंतर काही दिवसातच भामट्याने पहिल्या पत्नी बरोबर दुसऱ्या पत्नीलाही सोडून पोबारा केला आहे. मारुती माने असे या तोतया पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात पाहिले पत्नीने मिरज शहर पोलीस ठाणे मध्ये गुन्हा दाखल केला आहे. (The truck driver pretended to be and got married for the second time) मिरज शहर पोलिसांनी या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मारुती माने, (वय ३७) हा एक ट्रक चालक आहे. मारुती माने याचे पहिले लग्न झाले आहे. मात्र त्याने मिरजेतील एका तरुणीला आपण पोलीस निरीक्षक आणि ५० एकर जमिनीचे मालक असल्याची बतावनी करून अडकवले. या तरुणीला अनेक वेळा दुचाकी व चारचाकी अशा वेगवेगळ्या गाडीतून फिरवत लग्नाचे आमिष दाखवत, तिच्यासोबत दुसरे लग्न देखील केले. क्लिक करा आणि वाचा- वास्तविक पहिले लग्न झालेले असताना मारुती माने याने पोलीस उपनिरीक्षक असल्याचे भासवून हे दुसरे लग्न केले आहे. लग्नानंतर त्याने या तरुणीला शहरात एका भाड्याच्या खोलीत ठेवले होते. काही दिवसांनी दुसऱ्या पत्नीच्या घरातून कामावर जात असल्याचे सांगून तो बाहेर पडला. त्यानंतर मारुती माने हा पसार झाला. क्लिक करा आणि वाचा- आपल्या पतीचे दुसऱ्या लग्नाची आणि त्याने पोलीस असल्याची बतावणी करून केलेली समोर आल्यानंतर संतापलेल्या पहिल्या पत्नीने थेट मिरज शहर पोलीस ठाणे गाठत तोतया पोलीस उपनिरीक्षक असणाऱ्या भामट्या पती विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीविरुद्ध माने याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/QRK2cyC
No comments:
Post a Comment