पुणे : ‘सध्या माझ्यापुढे शेतकऱ्यांचे इतके प्रश्न आहेत की त्यामुळे इतर कोण नाराज आहे, कोण काय करीत आहे किंवा राजकारणात काय घोडेबाजार सुरु आहे याकडे पहायला वेळ नाही. (Sadabhau Khot) हे शेतकरी नेते आहेत का हे माहिती नाही. ते विधानपरिषदेत ६ वर्ष होते. मात्र, त्यांनी एकही शेतक-यांचा प्रश्न विधान सभेत विचारला नाही. आमच्याकडे होते त्यावेळी ते शेतकरी नेते होते. आता ते शेतकरी नेते नाहीत,’ अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष (Raju Shetti) यांनी केली. सदाभाऊ खोत यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याबाबत पत्रकारांनी शेट्टी यांना प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना शेट्टी यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. ( criticizes ) ... तर ऊस साखर आयुक्तालयात आणून पेटवू राज्यातील साखर कारखान्यांमध्ये ऊस शिल्लक नसल्याने सर्व कारखाने बंद करण्यात आले आहेत, असे साखर आयुक्त शेखर गायकवाड हे सांगत आहेत. ऊस शिल्लक नाही ही बाब चांगलीच आहे. त्याबाबत आम्ही माहिती घेऊ. पण ऊस शिल्लक राहिल्यास तो साखर आयुक्तालयात आणून पेटवू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिला. क्लिक करा आणि वाचा- शेट्टी म्हणाले, ‘पुढच्या वर्षीही गेल्या वर्षीप्रमाणेच पीक पाण्याची परिस्थिती अशीच राहणार आहे. यामुळे राज्यातील बंद कारखाने पुन्हा सुरू करण्यात यावे. यासाठी साखर आयुक्तांनी आतापासून प्रयत्न करणे गरजेचे आहे. राज्यातील कारखान्यांनी विस्ताएक्सपान्शन मागणी केली आहे. त्यातील ६५ हजार टनांची क्षमता असलेले कारखाने हंगामापूर्वी सुरू झाले तर शेतक-यांच्या ते फायद्याचे राहिल. जर हे नाही झाले तर पुन्हा पुढच्या वर्षीही शिल्लक उसाचा प्रश्न हा कायम राहणार आहे.’ क्लिक करा आणि वाचा- दरम्यान, राज्यात साखरेसह ऊस उत्पादनात अव्वल ठरलेल्या महाराष्ट्रात आता इथेनॉल निर्मितीची क्षमता देखील १६४ कोटी लिटरवरून २६४ कोटी लिटरपर्यंत वाढली आहे. सहकारी तसेच खासगी क्षेत्रातील १२७ कारखान्यांनी इथेनॉल प्रकल्पांचा विस्तार केला आहे. क्लिक करा आणि वाचा- राज्यातील एकूण ११२ इथेनॉल प्रकल्पांनी हंगामात बुधवारअखेर १०० कोटी लिटर इथेनॉल निर्मिती केली आहे. या प्रकल्पांची क्षमता १६४ कोटी लिटर होती. या वर्षी देशात ४५ हजार कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती झाली. महाराष्ट्रात १३४ कोटी लिटरची निर्मिती झाली असून देशाच्या तुलनेत इथेनॉल निर्मितीत ३० टक्के वाटा आहे. बुधवार अखेर १२७ इथेनॉल प्रकल्पांनी इथेनॉल निर्मितीच्या क्षमतेत वाढ करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे एकूण वार्षिक २६४ कोटी लिटरवर गेली आहे. तेल कंपन्यांना इथेनॉलचा पुरवठा झाल्यावर २१ दिवसांनी साखर कारखान्यांना पैसे दिले जात असल्याने त्यांना दिलासा मिळत आहे, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/m34nxew
No comments:
Post a Comment