म. टा. प्रतिनिधी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या () वार्षिक उत्सवामध्ये चार वर्षांपूर्वी झालेल्या वादातून संघ शिक्षकाला दंड, चामडी पट्ट्याने बेदम मारहाण करण्यात आली. सहकारनगर भागात हा प्रकार घडला. हर्षवर्धन सुनील हरपुडे (वय २१, रा. तावरे कॉलनी, सहकारनगर) याने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी कुंदन सोनावणे, रुपेश खाडे, अमन शेख, हेमंत जाधव यांच्यासह चार ते पाच अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (a teacher of rashtriya swayamsevak sangh has been beaten by four to five minors) सहकारनगरच्या अध्यापक कॉलनीतील मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत हर्षवर्धन मुलांना प्रशिक्षण देतो. टांगेवाला कॉलनी येथील रहिवासी हेमंत जाधव, कुंदन सोनावणे, अमन शेख हे शाखेत येत असत. चार ते पाच वर्षांपूर्वी शाखेच्या वार्षिक उत्सवामध्ये वाद झाल्यामुळे आरोपींनी शाखेत जाणे बंद केले होते. क्लिक करा आणि वाचा- दोन दिवसांपूर्वी हर्षवर्धन नेहमीप्रमाणे शाखेत गेला होता. त्या वेळी काही मुले त्याचा सहकारी अमित हिरणवाळेला मारहाण करत होती. त्या वेळी हर्षवर्धनने मध्यस्थी केली. त्यानंतर आरोपी हेमंत जाधव, कुंदन सोनावणे साथीदारांसह तेथे आले. कुंदनने चामडी पट्ट्याने आणि रुपेशने मैदानावर पडलेल्या झाडाच्या फांदीने हर्षवर्धनला बेदम मारहाण केली. कट्ट्यावर ठेवलेला लाकडी दंड हर्षवर्धनच्या पाठीत मारून त्याला जखमी केले. क्लिक करा आणि वाचा- या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक सी. पी. बेरड हे करीत आहेत. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/9Iq5jHh
No comments:
Post a Comment