Breaking

Thursday, June 9, 2022

सलमान खान धमकी प्रकरण: सौरभ महाकालची मुंबई गुन्हे शाखेकडून चौकशी https://ift.tt/Ycy0nqe

म. टा. प्रतिनिधी, पुणे पंजाबमधील गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला खून प्रकरणातील संशयित गुंड उर्फ याची मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अभिनेता सलमान खान धमकी प्रकरणात गुरुवारी चौकशी करण्यात आली. दिल्लीतील गुंड लॉरेन्स बिष्णोई टोळीने मुसेवालाची हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याच बिष्णोई टोळीने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. ( was questioned by the mumbai crime branch) मोक्का कायद्यान्वये कारवाई केल्यानंतर महाकाल फरार होता. त्याला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांचे पथक गुरुवारी पुण्यात चौकशीसाठी दाखल झाले. मुसेवाला खून प्रकरणात संतोष जाधव आणि सौरभ महाकाल संशयित आरोपी आहेत. क्लिक करा आणि वाचा- मंचरमधील गुंड ओंकार उर्फ राण्या बाणखेले खून प्रकरणात संतोष जाधव याला सिद्धेश कांबळे उर्फ महाकाल याने आश्रय दिला होता. ग्रामीण पोलिसांनी त्यांच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यावन्ये (मोक्का) कारवाई केली होती. पुणे ग्रामीण पोलिसांकडून बाणखेले खून प्रकरणाचा तपास सुरू आहे. अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी प्रकरणात मुंबई पोलिसांनी महाकालची चौकशी केली. मुसेवाला हत्या प्रकरणाचा तपास पंजाब पोलिसांकडून करण्यात येत आहे, असे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांनी सांगितले. क्लिक करा आणि वाचा- पंजाबला गेलो नव्हतो आपण पंजाबला गेलो नव्हतो, असा दावा सौरभ महाकालने मुंबईच्या गुन्हे शाखेकडून करण्यात आलेल्या चौकशीमध्ये केला आहे. मी आणि भाऊ शेती करतो, असे महाकाल याने या चौकशीत सांगितले. महाकाल याचे शिक्षण सातवीपर्यंत झाले आहे. त्याचे वडील आळेफाटा येथे चालक म्हणून काम करतात. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/OIUrwXV

No comments:

Post a Comment