Breaking

Sunday, June 26, 2022

करोना: राज्यात गेल्या दोन दिवसांत ६,४९३ नवे रुग्ण, ५ मृत्युमुखी https://ift.tt/gz1c47R

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होत आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये राज्यात ६ हजार ४९३ इतक्या नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर ५ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या बरोबरच राज्यातील मृत्यूदर १.८५ टक्के इतका आहे. यात चिंतेची बाब म्हणजे निदान झालेल्या रुग्णांची संख्या बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांच्या संख्येहून अधिक आहे. दोन दिवसांमध्ये एकूण ६ हजार २१३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ( maharashtra registered 6493 new cases in two days with 6213 patients recovered and 05 deaths) दरम्यान, आयसीएमआर पोर्टल मधील तांत्रिक बिघाडामुळे राज्यातील कोविड रुग्णांची संपूर्ण दैनंदिन माहिती मिळण्यास काल अडचण आली होती. कालची उर्वरित रुग्ण संख्या आजच्या अहवालात समाविष्ट करण्यात आल्याने आज रुग्ण संख्या अधिक दिसते आहे. क्लिक करा आणि वाचा- तसेच, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,१८,५२,६५३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७९,६२,६६६ (०९.७३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात बी ए. ५ आणि बी ए. ४ व्हेरीयंटचे आणखी ५ रुग्ण बी जे वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांच्या ताज्या अहवालानुसार बीए.५ व्हेरीयंटचे ३ आणि बी ए.४ चे २ रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण मुंबई येथील आहेत. हे सर्व नमुने १० ते २० जून २०२२ या कालावधीतील आहेत. राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए.४ आणि बीए.५ रुग्णांची संख्या ५४ झाली आहे. या पैकी पुण्यात १५, मुंबईत ३३,नागपूर येथे ४ तर ठाण्यात २ आढळले आहेत. क्लिक करा आणि वाचा- पुणे शहरात रुग्ण्संख्येचा रविवारी उच्चांक रविवारी पुणे शहरात ३७५ नवीन रुग्ण आढळले असून सक्रिय रुग्णांची संख्या दोन हजार ६४ इतकी झाली आहे. करोनाचे बीए. ४ व बीए. ५ हे नवीन व्हेरिएंट ची बाधा झालेले रुग्ण आढळून येत असून त्यांची संख्या पुण्यासह मुंबईत वाढताना दिसून येत आहे. या नव्या व्हेरिएंटमुळे रुग्णसंख्या वाढणार असल्याची शक्यता आरोग्य यंत्रणेकडून व्यक्त केली जात आहे. ही शक्यता आता खरी होताना दिसून येत आहे. रविवारी उच्चांकी रुग्ण आढळून आले आहेत. क्लिक करा आणि वाचा- पुणे शहरात नुकतीच पालखी येऊन गेली आहे. या पालखीमध्ये लाखो लोक एकत्र आले होते. त्यामुळे ही संख्या वाढली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शनिवारी पुणे शहरात रविवारी नवीन ३७५ रुग्ण आढळून आले, तर २२७ रुग्ण बरे झाले. करोना संसर्ग झालेल्या रुग्णांचे हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचे प्रमाण हे ३.७३ टक्के आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये, करोनाच्या नियमाचे पालन करावे, असे अवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/W27w1hC

No comments:

Post a Comment