: यथेच्छ मद्य प्राशन केल्यानंतर पाच तरुणांमध्ये झालेला वाद विकोपाला जाताच चौघांनी त्यातील एकाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान, एकाने कमरेतील काढली आणि ती इतरांवर रोखली. सुदैवाने रिव्हॉल्व्हर लॉक झाल्याने पुढील अनर्थ टळला. एक पादचाऱ्याच्या माहितीवरून पोलिसांनी घटनस्थळी पोहोचत पाचही आरोपींना अटक केली. ही घटना एन-५ येथील रामगिरी हॉटेलसमोर घडली. ( in ) या प्रकरणी निलेश सुदाम देहाडे (वय-३२, रा. ठाकरेनगर, औरंगाबाद), निखिल विजयानंद आगलावे (वय- १९, रा. ठाकरे नगर, औरंगाबाद), शिवराज दत्तात्रय संबळे (वय-२८, रा. अंबिकानगर), योगेश नागोराव हेकाडे (वय-३२, रा.अंबिकानगर) व एक अल्पवयीन अशा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्लिक करा आणि वाचा- या प्रकरणी अधिक माहिती अशी की, शनिवारी मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास जालनारोडवरील हॉटेल रामगिरी येथे पाचजण हे आपसात मारहाण करीत होते. त्यांची एकमेकांना दगडाने मारहाण सुरू होती. दरम्यान, निलेश देहाडे याने स्वतःजवळ असलेली विना परवाना रिव्हॉल्व्हर समोरील आरोपीवर रोखली आणि फायरिंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र ती रिव्हॉल्व्हर लॉक झाली. क्लिक करा आणि वाचा- दरम्यान एका पदचाऱ्याने या घटनेबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला कळविले. तातडीने सिडको, मुकुंदवाडी आणि पुंडलीकनगर ठाण्याच्या पोलिसांनी घटनस्थळी धावघेत पाचही आरोपींना अटक केली. पाचही आरोपी एवढे मद्यधुंद होते की, त्यांना चालणे तर सोडा, पण बोलताही येत नव्हते. क्लिक करा आणि वाचा- या प्रकरणी सिडको पोलिसांनी विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी पवार करीत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/lOYvLpm
No comments:
Post a Comment