: दिल्लीतील लाल किल्ल्यावर () हिरव्या रंगाचा झेंडा व त्यावर पाकिस्तानाच्या झेंड्याप्रमाणे अर्धचंद्र व चांदणी असलेला व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट करणाऱ्या युवकाला नगरच्या कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. अदनान आयाज सय्यद (वय २१ रा. कोतवाली पोलिस ठाण्याच्यासमोर, अहमदनगर) असे त्या युवकाचे नाव आहे. (a for posting on ) या प्रकरणी कुणाल सुनील भंडारी (वय २८ रा. आनंदनगर, रेल्वेस्टेशन, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. सोशल मिडियात हा आक्षेपार्ह व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांनी गुन्हा दाखल करून तातडीने त्या युवकाचा शोध घेऊन त्याला पोलिस ठाण्यात आणले. १० जूनच्या रात्री ८ वाजण्याच्या सुमारास सय्यद याने हा व्हिडिओ पोस्ट केल्याचे दिसून आले. क्लिक करा आणि वाचा- फिर्यादीत म्हटले आहे की, सय्यद याने इंस्टाग्रामवर द्वेष व दृष्टाव्याच्या भावना वाढविण्याच्या उददेशाने तसेच दोन गटात शत्रुत्व निर्माण होईल या उद्देशाने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. लाल किल्ला या राष्ट्रीय स्मारकावर भारताचा राष्ट्रध्वजाच्या जागी हिरव्या रंगाचा ध्वज फडकविताना व्हिडिओतून दाखविले आहे. त्यावर एक घंटो का काम हो जायगा, असा मजकूरही लिहिला आहे. क्लिक करा आणि वाचा- इस्लाम धर्माचा हिरवा झेंडा दाखवून त्यावर पाकिस्तानच्या झेंडयावर असते त्याप्रमाणे अर्धचंद्र व चांदणीचे पांढऱ्या रंगातील चिन्ह दाखविले आहे. यातून राष्ट्रीय ध्वजाचा आणि राष्ट्रीय स्मारकाचा अवमान केला आहे, असेही फिर्यादीत म्हटले आहे. क्लिक करा आणि वाचा- पोलिसांनी आरोपी सय्यद याच्याविरूद्ध धार्मिक तेढ निर्माण करणे, राष्ट्रीय प्रतिके आणि स्मारकाचा अवमान करणे यासंबंधीची कलमे लावली आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/t4KyEpB
No comments:
Post a Comment