Breaking

Wednesday, June 29, 2022

मासे पकडण्यासाठी तलावात उतरला, गाळात पाय रुतला आणि... https://ift.tt/hTRUV9Z

: जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे तलावात मासे पकडण्यासाठी तरुण उतरला. मात्र गाळात पाय रुतल्याने तलावात बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. संजय पंडित मोरे (वय- ३५, रा. जळके वसंतवाडी, ता. जळगाव) असे मृत तरूणाचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी तलावात त्याचा मृतदेह तरंगतांना आढळून आल्याने घटना उघड झाली आहे. (A man drowned while fishing in a lake in Jalgaon) याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील जळके वसंतवाडी येथील रहिवाशी संजय मोरे हा तरूण आपल्या आई-वडील, भाऊ व पत्नीसह वास्तव्याला आहे. हातमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होता. मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास तो शिरसोली शिवारातील तलावात मासे पकडण्यासाठी गेला होता. तलावात असल्याने त्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. क्लिक करा आणि वाचा- कुटुंबीयांकडून शोध सुरु अन् आली मृत्यूची बातमी.. इकडे संजय घरी न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. परंतु, तो कुठेही आढळून आला नाही. बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह तलावाच्या पाण्यात तरंगताना आढळून आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राठोड, जळके वसंतवाडीचे पोलीस पाटील संजय चिमणकारे, शिरसोली येथील पोलिस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह तलावाच्या बाहेर काढला. क्लिक करा आणि वाचा- सायंकाळी ७ वाजता मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/GXY65Fq

No comments:

Post a Comment