मुंबई: शिवसेना आमदारांच्या बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेलं सत्तानाट्य आता शेवटाकडं आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर सोशल मीडियावर सामान्य जनतेसह सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. हा सत्तासंघर्ष सुरू असताना अनेक घडामोंडींवर ट्वीटद्वारे सतत प्रतिक्रिया देणारा अभिनेता यानं मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर ट्वीट केलं आहे. 'महाराष्ट्राची जनता जिंकली' असं ट्वीट आरोहनं केलं आहे. हे ट्वीट केल्यानंतर त्याला अनेकांनी पाठिंबा दिलाय तर बऱ्याच जणांनी त्याला ट्रोल देखील केलं आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Nr8nZAD
No comments:
Post a Comment