बीड: अवैध गर्भपात आणि गर्भलिंग तपासणी प्रकरणांमध्ये, बीड पोलिसांना यश आले आहे. औरंगाबादमधून गर्भलिंग निदान करणाऱ्या शिकाऊ डॉक्टरच्या मुसक्या आवळण्यात बीड पोलिसांना यश आलंय. सतीश बाळू सोनवणे असं अटक करण्यात आलेल्या शिकाऊ डॉक्टरचे नाव आहे. बीडच्या बक्करवाडी येथील शीतल गाडे वय 30 या महिलेचा, अवैध गर्भपात करताना 5 जून रोजी मृत्यू झाला होता. या प्रकरणात बीडच्या पिंपळनेर पोलीस ठाण्यात मृत शितल गाडे यांच्या पतीसह सासरा , भाऊ आणि तर 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यातील आरोपी सीमा डोंगरे हिचा पाली येथील तलावात मृतदेह आढळून आलाय. सतीश सोनवणे याने मृत शितल गाडे या महिलेचे गर्भलिंग निदान केल्याची कबुली दिली आहे.हा आरोपी औरंगाबाद येथून नगर या ठिकाणी आल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अटक केलीय. तर गर्भलिंग निदान करण्यासाठी सोनवणे हा 10 हजार रुपये घेत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिलीय. दरम्यान आरोपी सतीश सोनवणे हा यापूर्वी जालना जिल्ह्यातील एका डॉ.गवारे नावाच्या व्यक्तीचा असिस्टंट म्हणून काम करत होता. तसेच मनीषा सानप ही सोनवणे ला फोनद्वारे माहिती देऊन बोलावून घ्यायची आणि सानपच्या घरी गर्भलिंग निदान केलं जायचं. त्यामुळं आता या सर्वांनी आतापर्यंत किती जणांचे गर्भलिंगनिदान केले असून किती जणांचा गर्भपात केला आहे ? यासाठी एजंट मनीशा सानप हिचा बीड पोलिसांकडून पीसीआर मागण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता नेमकं कोण कोण आहेत ? हे चौकशी अंती निष्पन्न होणार आहे. अंगणावाडी सेविका पोलिसांच्या ताब्यात माजलगाव तालुक्यातील एका महिलेचा गर्भपात करण्याच्या प्रयत्नात मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली होती. शीतल गाडे असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी महिलेचे नातेवाईक आणि गर्भलिंग निदान करण्यास मदत करणाऱ्या एका अंगणवाडी सेविकेला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे बीड जिल्ह्यात अवैध गर्भलिंग निदान आणि नियमबाह्य गर्भपात करणारे रॅकेट सुरू असल्याचा संशय बळावला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/o45rZ2x
No comments:
Post a Comment