मुंबई: राज्यात , उपनगरे, ठाणे आणि राज्यातील , , औरंगाबाद, अनेक जिल्ह्यांना मान्सूनपूर्व पावसाने (Pre-Monsoon Rain) तडाखा दिला आहे. विजांच्या गडगटासासह मुंबईसह कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. यादरम्यान आलेल्या वादळी पावसाने राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला असून विविध ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत एकूण ६ जणांचे बली गेले आहेत. (so far 6 people have died due to pre monsoon rains in the state) अहमदनगरमध्ये चौघांचा बळी अहमदनगर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने चौघांचा बळी घेतला आहे. दुर्घटनेत वादळी वाऱ्यामुळे भिंत अंगावर कोसळून तीन जण ठार झाले आहेत. यात दोन जण जखमी झाले आहेत. तर दुसऱ्या एका घटनेत वादळी पावसाने झाड अंगावर पडून एक महिला ठार झाली. संगमनेर तालुक्यात पठार भागातील अकलापूर गावांतर्गत येणाऱ्या मुंजेवाडी शिवारात ही दुर्घटना घडली आहे. मृतांमध्ये एका १० वर्षीय चिमुकल्याचा देखील समावेश आहे. तर दुसऱ्या एका घटनेत वादळी पावसाने झाड अंगावर पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. क्लिक करा आणि वाचा- नाशिकमध्ये अंगावर वीज पडून महिला ठार नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे चक्रीवादळ आणि जोरदार पावसाने तडाखा दिला. तसेच तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाने हजेरी लावली. नाशिकमधील संसारी येथे वीज अंगावर पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तसेच चांदवड येथे कांद्याचे शेड अंगावर पडून माजी आमदार शिरीष कोतवाल हे जखमी झाले. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांबही कोसळल्याने वीजपुरवठाही खंडित झाला.शहरातून जाणाऱ्या मुंबई-इंदौर महामार्गवर समोरच काही दिसत नव्हतं त्यामुळे चालकांनी जागच्या जागी वाहने थांबवून घेतली होती.वादळ आणि पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे क्लिक करा आणि वाचा- जळगाव जिल्ह्यातही एका शेतकऱ्याचा मृत्यू जळगाव जिल्ह्यात गुरुवारी चाळीसगावसह रावेर तालुक्यालाही मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले. या दरम्यान पाचोरा तालुक्यात वीज कोसळून शेतात काम करत असणाऱ्या एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. पाचोरा तालुक्यातील गाळण बुद्रूक येथे ही दुर्घटना घडली. कैलास बारकू पाटील (वय, ४६ वर्षे) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. क्लिक करा आणि वाचा- मान्सून २४ तासांमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी मान्सूनचे आगमन होणार आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Gsy9mn0
No comments:
Post a Comment