Breaking

Thursday, June 9, 2022

येत्या काही तासांत राज्यातील 'या' भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता; हवामान विभागाचा इशारा https://ift.tt/ubDMRg7

मुंबई: मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या मान्सूनपूर्व पावसाने (Pre-Monsoon Rain) जोरदार तडाखा देत आतापर्यंत एकूण ६ जणांचे बळी घेतले आहेत. राज्यातील अनेक भागात आताही पडत असून येत्या काही तासांत मुंबई, ठाणे, जळगाव, अहमदनगर आणि बीड जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या दरम्यान ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यासह हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा इशारा देतानाच नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी, असे हवामान विभागाने म्हटले आहे. ( to occur at isolated places in the state) या बरोबरच पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विजांच्या कडकडाटासह ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने येणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह मध्यम ते तीव्र पाऊस पालघर जिल्ह्यातील काही ठिकाणी पडण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन भारतीय हवामान विभागाने केले आहे. क्लिक करा आणि वाचा- दरम्यान, आज सोसाट्याच्या वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना तडाखा दिला. यामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये एकूण ६ जणांचे बळी गेले आहेत. यात चौघांचा अहमदनगरमधील संगमनेर येथील, तर नाशिक आणि जळगावमध्ये प्रत्येकी एकाचा समावेश आहे. क्लिक करा आणि वाचा- राज्यात आतापर्यंत ६ जणांचे बळी मुंबईसह कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाने विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली. राज्याच्या या भागांमध्ये आज अनेक ठिकाणी पावसाने जोरदार तडाखा दिला. यादरम्यान घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत एकूण ६ जणांचे बळी गेले आहेत. यात अहमदनगर जिल्ह्यात चौघांचा, तर नाशिक आणि जळगावमध्ये प्रत्येकी एकाचा समावेश आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/lL9KZUR

No comments:

Post a Comment