म. टा. प्रतिनिधी, पुणे मध्य रेल्वेने प्रत्येक विभाग, कार्यशाळा आणि शेड ही साहित्यापासून मुक्त करण्यासाठी 'झिरो स्क्रॅप मिशन' सुरू केले आहे. गेल्या दोन महिन्यात मध्य रेल्वेने विक्री केलेल्या भंगारातून तब्बल ५७.२९ कोटी रूपयांचा मिळविला आहे. (revenue of more than rs 57 crore to railways from disposal) मध्य रेल्वेने भंगार साहित्यापासून मुक्तता मिळविण्यासाठी झिरो स्क्रॅप मिशन उपक्रम हाती घेतला. त्यामध्ये मध्य रेल्वेच्या सर्व विभाग, कार्यशाळा, शेड आणि विविध डेपोवर भंगार विक्री करण्यात येत आहे. या भंगार सामग्रीमध्ये स्क्रॅप रूळ, पर्मनंट-वे सामग्री, भंगार (वापरात नसलेले) डबे, वॅगन आणि लोकोमोटिव्ह इत्यादींचा समावेश आहे. क्लिक करा आणि वाचा- गेल्या दोन महिन्यात भंगाराच्या विक्रीतून ५७.२९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ९.२१ कोटी रुपयांच्या महसूल मिळाला होता. मध्य रेल्वेने २०२१-२२ या आर्थिक वर्षात भंगार विक्रीतून ५३०.३४ कोटी रुपयांचे महसूल प्राप्त केला आहे. याबाबत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, म्हणाले की, भंगाराची विल्हेवाट लावल्याने महसूलाबरोबच परिसर स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासही मदत झाली आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/xj15aXu
No comments:
Post a Comment