Breaking

Monday, June 6, 2022

मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज, दुबईतील ट्वेन्टी-२० लीगमध्ये आयपीएलचे तीन संघ उतरणार https://ift.tt/ZYz8Ktw

मुंबई : आयपीएल संपलेला असली तरी मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आली आहे. कारण आता दुबईमध्ये एक ट्वेन्टी-२० स्पर्धा होणार आहे. या लीगमध्ये आयपीएलमधील तीन संघ उतरणार असल्याचे समोर येत आहे. या लीगमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजदेखील आपला संघ उतरवणार असल्याचे आता समोर आले आहे. आयपीएलमधील कोणते तीन संघ दुबईतील लीगमधील उतरणार आहेत, पाहा...या लीगमध्ये सहा संघ असणार आहेत, पण या सहापैकी यावेळी पाच संघ ही भारतामधील असणार आहेत. कारण मुंबई इंडियन्सची मालकी असलेला रिलायंस इंडस्ट्रीज हा उद्योग समूह या लीगमध्ये आपला संघ उतरवणार आहे. त्याचबरोबर कोलकाता नाइट रायडर्सचा मालक शाहरुख खानही या लीगमध्ये आपला संघ उतरवणार आहे. आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सच्या संघाची मालकी जीएमआर ग्रुपकडे आहे. हा ग्रुपदेखील या लीगमध्ये आपला संघ उतरवणार आहे. त्याचबरोबर या लीगमध्ये भारतामधील अदानी स्पोर्ट्स लाइन आणि कॅपेरी ग्लोबल कंपनी आपले संघ उतरणार आहेत. त्याचबरोबर या लीगमध्ये लान्सर कॅपिटल ही कंपनी आपला संघ उतरवणार आहे. लान्सर ही कंपनी मँचेस्टर युनायटेडचे मालक ग्लेजर कुटुंबियांशी संबंधित आहे. कुठे आणि कशी होणार स्पर्धा, जाणून घ्या...ही स्पर्धा ६ जानेवारी ते १२ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत होणार आहे. या लीगमध्ये ३८ दिवसांत ३४ सामने खेळवण्यात येणार आहेत. या लीगमधील प्रत्येक संघ दुसऱ्या संघाबरोबर २-२ सामने खेळणार आहेत. त्यानंतर प्ले ऑफचे चार सामने खेळवण्यात येणार आहेत. संयुक्त अरब अमिराती क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शेख नाहयान मबारेक यांनी सांगितले की, " आमच्या अमिराती क्रिकेट मंडळाला रिलायंस इंडस्ट्रीज, कोलकाता नाइड रायडर्स, जीएमआर, लान्सर कॅपिटल, अदानी स्पोर्ट्स लाइन, कॅपेरी ग्लोबल यांच्यासह अन्य हितधारकांशी जोडल्याबद्दल नक्कीच आनंद आहे. आपल्या लीगबरोबर या अनुभवी कंपन्या जोडलेल्या आहेत आणि ही एक सर्वात चांगली गोष्ट आहे. कारण या कंपन्यांना संघांबरोबरच स्पर्धांचा चांगला अनुभव आहे. या लीगमध्ये स्थानिक क्रिकेटपटूंनाही चांगली संधी मिळेल, असे आम्हाला वाटते. त्यामुळे ही लीग आमच्यासाठी महत्वाची आहे."


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/ApcI9zK

No comments:

Post a Comment