म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर जिल्ह्यातील कुरूंदवाड गावातील नागरिकांनी अधिकाऱ्याविरोधात भ्रष्टाचाराचे गाडीभर गोळा केले आणि ते वाजत गाजत मिरवणुकीने थेट कार्यालयातच आणले. या अनोख्या आंदोलनाची चर्चा सध्या सुरू आहे. (citizens took out evidence in a procession against a government official) या अनोख्या आंदोलनाची पार्श्वभूमी फारच वेगळी आहे. कुरूंदवाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले गेले. भुखंड वाटप, पाणी पुरवठा, कामगार भरती अशा अनेक बाबतीतच्या या तक्रारी आहेत. या सर्व घोटाळ्यांची चौकशी करावी अशी मागणी नागरिकांतून होत होती. त्यामुळे अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी समिती नियुक्त केली. क्लिक करा आणि वाचा- जाधव यांच्या या भ्रष्टाचाराची त्रिसदस्यीय समितीमार्फत चौकशी सुरू आहे. समितीने नागरिकांकडे भ्रष्टाचाराचे पुरावे मागितले. त्यानुसार कुरुंदवाड शहर बचाव समितीच्यावतीने पुरावे गोळा केले. आठ दिवसात एवढे पुरावे गोळा झाले की ते हातातून घेऊन जाणेही अशक्य झाले. त्यामुळे नागरिकांनी अनोख्या पद्धतीने हे पुरावे देण्याचे ठरविले. क्लिक करा आणि वाचा- त्याप्रमाणे कुरुंदवाड शहर बचाव कृती समितीच्या वतीने येथील भालचंद्र थेटर चौकातून घोडागाडीतून गाडीभर पुरावे बँड पथकाच्या तालात वाजत गाजत त्रिसदस्यीय समितीला देण्यात आले. क्लिक करा आणि वाचा- यावेळी कुरुंदवाड शहर बचाव कृती समितीचे अध्यक्ष हर्षद बागवान, माजी नगरसेवक राजू आवळे, शिवसेना शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे, माजी उपनगराध्यक्ष शिवसेना नेते दयानंद मालवेकर, राजेंद्र बेले, गौतम ढाले, बबलू पवार,आयुब पट्टेकरी चाँद कुरणे, रघु नाईक, सुनील कुरुंदवाडे, धम्मपाल ढाले, शंकर तोबरे या मान्यवर असं शिवसेना व शहर बचाव कृती समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/wcdeyXm
No comments:
Post a Comment