पाटणा : बिहारच्या आठ जिल्ह्यांमध्ये वादळ आणि वीज कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून चार लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. बिहारमध्ये मान्सूनचा पाऊस दाखल झाल्यानंतर संपूर्ण राज्यात ३ ते ४ दिवसांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. हवामान विभागाच्या अंदाजानुसार बिहारमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार १५ जूनपासून बिहारमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. बिहारमध्ये पूर्णिया येथे १३ जूनला मान्सून दाखल झाला होता. बिहारमधील सीमांचंल मधील अररिया, किशनगंज, पूर्णिया, कटिहार, सुपोल जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस सुरु झाला आहे. शनिवारी रात्री आणि रविवारी वादळ आणि वीज कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला आहे. भागलपूरमध्ये ६, वैशालीमध्ये ३, खंगडियामध्ये २, कटिहारमध्ये १, सहरसा १, मधेपुरा १ आणि मुंगेरमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये हवामान विभागाच्या माहितीनुसार नैऋत्य मान्सूनच्या पावसाची सुरुवात १३ जूनला सुरुवात झाली आहे. मान्सूनचा प्रभाव बिहारच्या किशनगंज, अररिया, पूर्णिया आणि सुपोल जिल्ह्यात दिसून येत आहे. दरवर्षीप्रमाणं बिहारमध्ये मान्सूनच्या पावसानं १३ जूनला हजेरील लावली आहे. हवामान विभागानं बिहारमध्ये आगामी काळात देखील वीज आणि वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्ता वर्तवली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/uhi9XI3
No comments:
Post a Comment