मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या शिल्पकारांपैकी एक म्हणून संजय राऊत ओळखले जातात. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा आणि विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर त्यांनी दोन ट्विट केली आहेत. मुख्यमंत्री अत्यंत ग्रेसफुली पायउतार झाले.आपण एक संवेदनशील सुसंस्कृत मुख्यंमंत्री गमावला आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत. दगाबाजीचा अंत चांगला होत नाही असे इतिहास सांगतो. ठाकरे जिंकले जनमानस देखील जिंकले.शिवसेनेच्या भव्य विजयाची ही सुरुवात आहे, असंही संजय राऊत म्हणाले. लाठ्या खाऊ,तुरुंगात जाऊ पण बाळासाहेबांची शिवसेना धगधगत ठेऊ! असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आणखी ट्विट केलं त्यात न्याय देवतेचा सन्मान केला जाईल असं म्हटलं. लोकशाहीचे चार स्तंभ, न्यायपालिकेचा स्तंभ कोसळला, अशा आशयाचा फोटो संजय राऊत यांनी ट्विट केलं. उद्धव ठाकरे काय म्हणाले? "काल पण मी आमच्या आमदारांना आवाहन केले तुमची नाराजी कोणावर आहे? ती सुरतला गुवाहाटीला जाऊन सांगण्यापेक्षा मातोश्री समोर येऊन बोला. मला समोरासमोर हवंय. त्यांच्याशी वाद नकोय. मुंबईत बंदोबस्त वाढवला स्थानबध्द करत नोटीस आल्या. चीन सीमेची सुरक्षा कदाचित मुंबईत लावली आहे. इतकं नाते तोडले. कुणीही शिवसैनिकांनी यांच्यामध्ये येऊ नये. नवीन लोकशाहीचा पाळणा हलणार आहे. मी सांगतो तुमच्या मध्ये कुणी येणार नाही. किती आमदार आहे लोकशाहीत डोकी फक्त मोजण्यासाठी असतात. माझ्या विरोधात एक जरी उभा झाला तर मला लाजिरवाणे वाटेल. मला उद्याचा खेळच करायचा नाही. शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राला खुर्चीवरुन खाली खेचण्याचे पुण्य त्यांना पदरी पडू द्या. त्यांचा आनंद मला हिसकावून घ्यायचा नाही". आम्ही हपापलेले नाही आहोत. मुंबई-हिंदुत्वासाठी झटतो. सगळ्या समोर मी मुख्यमंत्री पदाचा त्याग करतो आहे. मी घाबरणारा नाही. उद्या त्यांच्या आनंदाचा दिवस आहे. त्यांना पेढे खाऊ द्या. मला शिवसैनिकांच्या प्रेमाचा गोडवा हवाय. वारकरी म्हणतात उध्दव ठाकरेंच्या हस्ते पुजा हवीय. माऊली म्हणतील ते मान्य. महाराष्ट्रात माझ्या काळात दंगल झाली नाही. मुस्लिम समाजाने पण माझं ऐकलं. मी आलोच अनपेक्षितपणे जातो पण तसाच आहे. नव्याने शिवसेना भवनात बसणार आहे. शिवसेना हिरावून घेऊ शकत नाही. मुख्यमंत्रिपदासोबत विधान परिषद सदस्यत्वाचा पण राजीनामा देतो. मी पुन्हा येईल असं बोललो नव्हतो. सहकारी पक्षातील सर्व नेत्यांचे आभार, सर्व शासकीस कर्मचारी सहकार्यांचे आभार, जय हिंद जय महाराष्ट्र...!
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/BCuD1Om
No comments:
Post a Comment