मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्ष तीव्र झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह १२ आमदारांची आमदारकी रद्द करण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आली आहे. नरहरी झिरवळ यांनी एकनाथ शिंदे यांनी पाठवलेलं भरत गोगावले प्रतोद असल्याचं ठराव फेटाळला आहे. नरहरी झिरवळ यांनी अजय चौधरी हे गटनेते असल्याचं म्हटलं आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष वाढत असताना हा सत्ता संघर्ष विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावापर्यंत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी एकनाथ शिंदे यांचा गट आम्ही महाविकास आघाडी सरकारचं समर्थन करत नसल्याचं म्हणू शकतात. शिंदे यांच्या गटानं सरकारनं बहुमत गमावलं आहे, असं म्हटल्यास अविश्वास ठराव आणला जाईल, असं अणे म्हणाले. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी अजय चौधरी यांना शिवसेना गटनेता नियुक्त केलं आहे. महाविकास आघाडी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणला जाण्याची शक्यता आहे. तर, शिवसेनेच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी सरकारकडून आम्ही विश्वासदर्शक ठरावाला सामोर जाऊ असं देखील सांगितलं आहे. बंडखोर गटाकडे किती संख्या आहे हे स्पष्ट झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारनं मतदान गमावलं असल्याचं स्पष्ट झाल्यास बंडखोर गट आणि भाजपकडून सरकार स्थापन करण्याचा दावा केला जाऊ शकतो, असं झाल्यास राज्यपाल विश्वासदर्शक ठराव मांडण्यास सांगितलं जाऊ शकतं. श्रीहरी अणे यांनी खरी शिवसेना कुणाची आणि पक्षाचं चिन्ह धनुष्य बाण कुणाचं हे चिन्ह ठरवणं हे भारतीय निवडणूक आयोगाचं काम नाही, असं म्हटलं. निवडणूक आयोगाचं काम हे राजकीय पक्षाची नोंदणी आणि निवडणूक चिन्ह देणं हे असतं. राज्यातील पक्षीय बलाबल महाराष्ट्रातील विधानसभेची सदस्य संख्या २८८ आहे. शिवसेनेच्या एका आमदाराचं निधन झाल्यानं सध्या २८७ सदस्य संख्या आहे. भाजपकडे १०६, शिवसेना, ५५, राष्ट्रवादी काँग्रेस ५३, काँग्रेस ४४ असं संख्याबळ आहे. राज्याच्या विधानसभेत बहुमाताचा आकडा १४४ इतका आहे. भाजपकडे १०६ आमदार आहेत. भाजपला बहुमतासाठी ३८ आमदारांची गरज आहे. काही अपक्षांचा भाजपला पाठिंबा मिळाल्यास आमदारांची संख्या कमी होऊ शकते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/CTedcFm
No comments:
Post a Comment