Breaking

Monday, June 20, 2022

टीम इंडियाचं ठरलं... रोहित शर्माबरोबर आता सलामीला कोण येणार, बीसीसीआयने शेअर केला Video https://ift.tt/VWvUJPz

लंडन : भारताचा सलामीवीर केएल राहुलला दुखापत झाल्यामुळे भारताचा सलामीवीर कोण असेल, हा प्रश्न भारतीय संघापुढे पडला होता. पण आता इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात रोहित शर्माबरोबर सलामीला कोण येणार, हे टीम इंडियाचे ठरले आहे. बीसीसीआयने याबाबतचा एक व्हिडीओ शेअर केला असून आता रोहितबरोबर सलामीला कोण येणार, हे त्यांनी स्पष्ट केले असल्याचे दिसत आहे. रोहितबरोबर सलामीला कोण येणार, जाणून घ्या... राहुल संघात नसला तरी भारतीय संघापुढे सलामीसाठी एक चांगला पर्याय आहे. रोहित शर्मा हा सलामीला येणार हे स्पष्ट झाले आहेच. पण रोहितबरोबर सलामीला कोण येणार, हा प्रश्न सर्वात मोठा होता. पण हा प्रश्न ाता सुटलेला आहे. भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध फक्त एकच कसोटी खेळायची आहे. त्यामुळेच संघ व्यवस्थापनाने राहुलऐवजी बदली खेळाडू संघात घेतलेला नाही. भारतीय संघात शुभमन गिल आणि मयांक अगरवाल यांच्या सोबत केएस भरत आहे. हे तिघेही सलामीवीर आहेत. पण या तिघांपैकी शुभमन गिलला रोहितबरोबर सलामी करण्याची संधी देण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कारण गिलने गेल्या काही सामन्यंमध्ये चांगली कामगिरी केली आहे आणि भविष्याचा एक चांगला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. त्यामुळे आता रोहितबरोबर सलामीला गिल येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. राहुलच्या दुखापतीमुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. भारताचा सलामीवीर केएल राहुल दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतून बाहेर झाला होता. आता तो इंग्लंड दौऱ्यावर देखील जाऊ शकणार नाही. राहुलवर शस्त्रक्रिया होणार असून तो जर्मनीला जाणार आहे. आगामी विश्वचषक डोळ्यापुढे ठेवत राहुलला पूर्णपणे फिट झाल्यावर शिवाय मैदानात उतरवणार नाही. त्यामुळे आता राहुल किमान १-२ महिने क्रिकेटपासून लांब राहील, असे म्हटले जात आहे. वनडे आणि ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये राहुलसाठी आता इशान किशन, ऋतुराज गायकवाडसारखे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे सध्याच्या घडीला तरी भारतीय संघाला चिंता करण्याचे काहीही कारण नाही.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/kcG0yYQ

No comments:

Post a Comment