Breaking

Sunday, July 24, 2022

उद्धव ठाकरेंची कारवाई, खासदार प्रतापराव जाधव यांची जिल्हा संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी https://ift.tt/0g9cnDB

बुलडाणा : पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे खासदार प्रतापराव जाधव यांची जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवेसना जिल्हा संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे, शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आलेल्या प्रसिद्धीस पत्रकाद्वारे अशी माहिती देण्यात आली आहे. याबाबतचे वृत्त आज शिवसेनेचे अधिकृत मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून प्रसिद्ध करण्यात आले आहे. शिवसेनेच्या १२ खासदाररांनी १९ जुलैला गट तयार करून एक पत्र लोकसभा अध्यक्षांना दिले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पाठींबा दिला होता. त्यांनी शिंदे गटाला पाठींबा दिल्यानंतर जिल्ह्यातील घाटाखालील काही शिवसेना पदाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेतली. जिल्हा प्रमुख शांताराम दाणे यांनी आम्ही खासदार प्रतापराव जाधव यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले होते. सामना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जिल्हा संपर्क प्रमुख खासदार प्रतापराव जाधव यांची जिल्हा संपर्क प्रमुख पदावरून तर जिल्हा प्रमुख शांताराम दाणे (मलकापूर जळगांव जामोद विधानसभा) उपजिल्हा प्रमुख राजु मिरगे, उपजिल्हा प्रमुख संजय अवताडे, तालुका प्रमुख नांदुरा संतोष डीवरे, तालुका प्रमुख मलकापूर विजय साठे, तालुका प्रमुख शेगांव रामा थारकार यांची पक्ष विरोधी कारवाई केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेतून हकालपट्टी केली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/FJ9tU2i

No comments:

Post a Comment