मुंबई: प्रसिद्ध गायक मिका सिंग () गुडघ्याला बाशिंग बांधून लग्नासाठी तय्यार होऊन बसला आहे. सध्या तो 'स्वयंवर: मिका दी वोटी' कार्यक्रमात त्याच्या जोडीदाराचा शोध घेत होता. त्याचा हा शोध संपला असून () ही त्याच्या आयुष्याची जोडीदार होणार आहे. या कार्यक्रमाच्या अंतिम तीन स्पर्धकांमध्ये आकांक्षानं बाजी मारली आहे. मिकाच्या आयुष्यात जोडीदार म्हणून येणारी आकांक्षा पुरी नेमकी आहे तरी कोण? हे वाचा- कोण आहे आकांक्षा पुरी मध्य प्रदेशातील इंदूर इथं २६ जुलै १९८८ मध्ये जन्मलेली आकांक्षा पुरी आजमितीला आघाडीची नायिका आणि मॉडेल म्हणून ओळखली जाते. आकांक्षानं दाक्षिणात्य तसंच बॉलिवूडमधील सिनेमांत काम केलं आहे. आकांक्षा लहानाची मोठी इंदूर इथंच झाली. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण तिनं इंदूर इथंच घेतलं. आकांक्षाचे वडील आर के पुरी सहाय्यक पोलिस आयुक्त आहेत. तर आई गृहिणी आहे. आकांक्षाचा बॉयफ्रेंड मीडिया रिपोर्ट्सनुसार, आकांक्षा बिग बॉसचा स्पर्धक पारस छाब्रा याच्याबरोबर रिलेशनमध्ये होती. बिग बॉस १३ मध्ये त्यांच्या नात्याबद्दल खुलासा झाला होता. सोनी टीव्हीवरून प्रसारित होणाऱ्या विघ्नहर्ता गणेश कार्यक्रमात आकांक्षानं पार्वतीची भूमिका केली होती. तर याच कार्यक्रमात पारसनं रावणाची भूमिका साकारली होती. या मालिकेवेळी त्या दोघांमध्ये प्रेम निर्माण झाले आणि ते डेटिंग करू लागले. त्यानंतर ते लिव इनमध्ये रहात होते. परंतु पारस जेव्हा बिग बॉसमध्ये आला तेव्हा त्यांचं नातं तुटलं. हे वाचा- आकांक्षाचं करीअर अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून आकांक्षानं तिची ओळख निर्माण केली आहे. आकांक्षानं टीव्हीबरोबरच तमिळ सिनेमांतही काम केलं आहे. २०१३ मध्ये एलेक्स पंडित या तमिळ सिनेमात तिनं काम केलं होतं. त्यानंतर ही तिनं अनेक तामिळ सिनेमात काम केलं. २०१५ मध्ये मधुर भांडारकर याच्या कॅलेंडर गर्ल सिनेमातून तिनं बॉलिवूडमध्ये प्रवेश केला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/eNDmTEn
No comments:
Post a Comment