Breaking

Monday, July 25, 2022

आमदाराशी असभ्य वर्तन करणे भोवले, सहाय्यक पोलीस निरीक्षकावर झाली कारवाई https://ift.tt/9JosNXf

नागपूर : आमदार आशीष जयस्वाल () यांच्याशी असभ्य वर्तन करणे रामटेक पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला भोवले. पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत एपीआयला निलंबित () केले. विवेक सोनवणे,असे निलंबित अधिकाऱ्याचे नाव आहे. (an assistant police inspector has been suspended for misbehaving with mla) सपन जयस्वाल यांचा रामटेकमध्ये पेट्रोल पंप आहे. १९ जुलैला रात्री ११ वाजताच्या सुमारास मोटारसायकलवर दोन युवक आले. तोपर्यंत पंप बंद झाला. कर्मचाऱ्यांनी त्यांना पेट्रोल पंप बंद झाल्याचे सांगितले. दोघांनी पेट्रोल पंपावर दगडफेक केली. कर्मचाऱ्यांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. दोघांनी शिवीगाळ केली. एका कर्मचाऱ्याने युवकाला थापड मारली. त्यानंतर दोन युवक, सपन व त्यांचे कर्मचारी रामटेक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला आले. क्लिक करा आणि वाचा- सावनवणे यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केली. माहिती मिळताच आमदार जयस्वालही पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. सोनवणे यांनी आ.जयस्वाल यांच्यासोबत असभ्य वर्तण केले. जयस्वाल यांनी पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्याकडे तक्रार केली. क्लिक करा आणि वाचा- मगर यांनी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश देत सोनवणे यांची ग्रामीण पोलिस नियंत्रण कक्षात बदली केली. चौकशीत दोषी आढळल्यानंतर सोनवणे यांना निलंबित करण्यात आले. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/vb8CaDJ

No comments:

Post a Comment