: आयबी (गुप्तहेर विभाग) खात्यात नोकरी लावण्याचा आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या तोतया आयबी अधिकाऱ्यास सांगली पोलिसांनी जेरबंद केले आहे. अभिषेक वैद्य, असे या तोतया आयबी अधिकारयाचे नाव असून तो मिरज तालुक्यातील आरग येथील रहिवासी आहे. या भामट्याकडून तिघांची पावणे सहा लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ( for cheating millions of rupees) सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एका अधिकाऱ्याला अटक केली आहे. अभिषेक वैद्य, (वय वर्ष २७, राहणार आरग, तालुका- मिरज) असे या भामटयाचे नाव आहे. मूळचे लातूर येथील सूरज सूर्यवंशी यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अभिषेक वैद्य याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्या तोतयागिरीचा भांडाफोड झाला आहे. क्लिक करा आणि वाचा- सूरज सूर्यवंशी हे पुण्यात टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी चालवतात, पिंपरी हिंजवडी या ठिकाणी अभिषेक वैद्य याची त्यांच्याशी ओळख झाली. त्यातून अभिषेक वैद्यने आपण केंद्रीय आयबी अधिकारी असल्याचे भासवले होते. या ओळखीतून सूरज सूर्यवंशी यांच्या लातूर या गावी अभिषेक वैद्य गेला होता. त्या ठिकाणी अभिषेक याने सुरज सूर्यवंशी व त्याच्या मित्रांना देखील आपण आयबीचे अधिकारी असल्याची बतावणी केली होती. या सगळ्यांना इंजीनियरिंग विभागातल्या लोकांच्यासाठी आयबीमध्ये जागा निघाल्या आहेत. त्या ठिकाणी आपण नोकरी लावू शकतो, असे आमिष दाखवले आणि या सर्वांना शेअर मार्केट बिटकॉइन यामध्ये पैसे गुंतवल्यास फायदा होईल, असे सांगितले. क्लिक करा आणि वाचा- तर आयबीमध्ये नोकरी लागण्याच्या अमिषामुळे सूरज सूर्यवंशी यांनी फोन पे द्वारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अभिषेक वैद्य यांच्याकडे साडेतीन लाख रुपये पाठवले. तसेच सूरज सूर्यवंशी यांचे मित्र अमित पटसाळगे यांनी ७५ हजार आणि जय डहाळे यांनी देखील आयबीमध्ये नोकरीसाठी दीड लाख रुपये अभिषेक वैद्य यांच्याकडे गुंतवले. मात्र, अभिषेक वैद्य हा आयबी अधिकारी नसल्याचे समोर आल्यानंतर सूरज सूर्यवंशी यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत त्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपास करत अभिषेक वैद्ययाला बेड्या ठोकल्या आहेत. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/sWZfVGg
No comments:
Post a Comment